महाराष्ट्र
409
10
दुष्काळाने बाधित १.१३ लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे
By Admin
दुष्काळाने बाधित १.१३ लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे
'ट्रिगर-१' अंतर्गत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू
नगर सिटीझनlive टिम प्रतिनिधी
अहिल्यानगर : जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये
'ट्रिगर-१' अंतर्गत दुष्काळाने बाधित झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी व महसूल विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. १ ऑक्टोबर अखेर जिल्ह्यातील बाधित १,६१० गावांपैकी १,२२७ गावांमध्ये पंचनाम्याचे काम पूर्ण झाले. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ३९ हजार २८३ शेतकऱ्यांच्या १ लाख १३ हजार ९३२ हेक्टरवरील (११.१७ टक्के) बाधित पिकांचे पंचनामे पूर्ण झाले. असे असले तरी उर्वरित ८९ टक्के क्षेत्रावरील पिकांच्या पंचनाम्याचे काम अद्याप बाकी आहे. उर्वरित पंचनामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात १० लाख २० हजार ७९ हेक्टरवर खरिपासह चारा व अन्य पिकांची लागवड झाली. जिल्ह्यात ११ लाख १० हजार ३३५ बाधित शेतकरी संख्या आहेत. २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत कृषी व महसूल विभागाच्या पथकाने पंचनाम्याचे काम सुरू केले. आतापर्यंत राहाता तालुक्यात सर्वाधिक ३४.२५ टक्के क्षेत्राचे (२०,३९० हेक्टर) व २३,७७० खातेदारांचे पंचनामे पूर्ण झाले. श्रीरामपूर तालुक्यात १९.९३ टक्के (७,०५१
जिल्ह्यातील दुष्काळ बाधित परिस्थितीची आकडेवारी
दुष्काळामुळे बाधित असलेल्या जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या : १,६१०
दुष्काळाने बाधित पिकांचे पंचनामे पूर्ण झालेली गावे: १,२२७ (७६.२१ टक्के)
जिल्ह्यातील पिकांचे एकूण पेरणी/लागवड क्षेत्र १० लाख २० हजार ७९ हेक्टर
पिकांचे पंचनामे पूर्ण झालेले क्षेत्र १ लाख १३ हजार ९३२ हेक्टर (११.१७ टक्के)
हेक्टर) आणि राहुरी तालुक्यात १८.२९ टक्के (११,६८८ हेक्टर) पंचनामे पूर्ण झाले आहेत. पाथर्डी १०,६९४ हेक्टर, अकोले तालुक्यातील ६,५९५ हेक्टर, पारनेर ९,५१४ हेक्टर आणि
नगर ६,८७५ हेक्टरवरील बाधित पिकांचे पंचनामे वेगाने सुरू आहेत. दुसऱ्या बाजूला, कोपरगाव तालुक्यात केवळ ३.२३ टक्के (१९०८ हेक्टर) क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले. तर शेवगाव ५३२०
जिल्ह्यातील ११ टक्के क्षेत्राचे पंचनामे झाले पूर्ण, ८९ टक्के क्षेत्रावरील पंचनामे करणे बाकी
राहात्यात सर्वाधिक, तर कोपरगावात सर्वात कमी क्षेत्राचे पंचनामे
जिल्ह्यातील राहाता तालुक्यात सर्वाधिक २३,७७० खातेदार शेतकऱ्यांच्या २०,३९० हेक्टर (३४. २५ टक्के) क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील ८, ५१९ शेतकऱ्यांच्या ७,०५१ हेक्टरचे (१९.९३ टक्के), राहुरी तालुक्यातील १३,०५७ खातेदारांच्या ११,६८८ हेक्टर (१८.२९ टक्के), पाथर्डी तालुक्यातील १४,१३१ शेतकऱ्यांच्या १०,६९४ हेक्टरचे (१२.८४ टक्के), अकोलेतील ११,५५० खातेदारांच्या ६,५९५ हेक्टर (९.९८ टक्के), संगमनेरातील ९,६४१ शेतकऱ्यांच्या ९,३२६ हेक्टर (११.०७टक्के), नगर तालुक्यातील ९,४७३ खातेदारांच्या ६,८७५ हेक्टर (१०.११ टक्के) आणि कोपरगावच्या २,१२६ खातेदार शेतकऱ्यांच्या १,९०८ हेक्टर (३.२३ टक्के), क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
उर्वरित पंचनामे अंतिम टप्यात; अहवाल वेळेत सादर करणार
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी हे सर्व यंत्रणांचा वेळोवेळी आढावा घेत आहेत. खरीप हंगाम २०२६ मध्ये 'ट्रिगर-१' लागू झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील १ लाख १३ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रावरील पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण १ लाख ३९ हजार २८३ बाधित शेतकरी खातेदारांचे पंचनामे नोंदवण्यात आले. उर्वरित बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाचे पथक प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करत आहे. या दृष्टीने बाधित पिकांचे पंचनामे वेळेत पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर केला जाईल.
- सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर,
हेक्टर (६.५८ टक्के), कर्जत ७०१० हेक्टर (७.७३ टक्के) आणि जामखेड ५०६४ हेक्टर (७.११ टक्के), श्रीगोंदा तालुक्यातील ५००१ हेक्टर (८.५३ टक्के) क्षेत्रावरील पंचनामे झाले
आहे. सर्व पात्र बाधित शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई मिळावी, यासाठी उर्वरित क्षेत्राचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
Tags :
409
10




