चारा छावण्या ऐवजी शेतकऱ्यांना थेट बॅक खात्यात अनुदान द्या.- मनिषाताई डांभे पाटील
पाथर्डी- प्रतिनिधी
चालू वर्षात दुष्काळी परिस्थिती मुळे शेतकरी आणि पशुपालक गंभीर अडचणीत सापडले असून दुष्काळात चारा छावणी किवा चारा डेपो ऐवजी पशुपालकांना थेट अनुदान बॅक खात्यात देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाधक्षा मनिषाताई डांभे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इमेल द्वारे निवेदनात केली आहे. दुष्काळी पार्श्वभुमीवर जनावरांच्या संगोपनाचा प्रश्न तिव्र बनला आहे या परिस्थितीत चारा छावण्या किवा डेपो चा अनुभव शेतकरी आणि पशुपालकांना तसेच प्रशासनालाही चांगला आलेला नाही त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे पशुपालकांना याचा फार मोठा त्रास सहन करावा लागला विशेषतः शेवगाव पाथर्डी तालुक्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे तेव्हा शासनाने सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून मदत करावी गाव खेड्यातील जनावरांचे टॅगिंग करून संख्या निश्चित करावी . यामुळे दुष्काळात पशुधन हाच आर्थिक आधार ठरेल ' आणि जनावरांचे संगोपन करण्यास मदत होईल . शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा असेही मनिषा डांभे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे