महाराष्ट्र
22425
10
लाल कांद्याला ४९०० रुपयांपर्यंत भाव, टोमॅटोला १५०० रुपये, तर गवारीला
By Admin
लाल कांद्याला ४९०० रुपयांपर्यंत भाव, टोमॅटोला १५०० रुपये, तर गवारीला प्रतिक्विंटल १० हजारांचा भाव
अहिल्यानगर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
नेप्ती उपबाजार आवारात शनिवारी २३ हजार ३१६ क्विंटल कांद्याची आवक झाली. यामध्ये लाल कांद्याला प्रतिक्विंटल ४९०० रुपये दर मिळाला असून, शेतकऱ्यांमध्ये यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
नेप्ती उपबाजार आवारात शनिवारी गावरान कांद्याची २० हजार ९७२ क्विंटल आणि लाल कांद्याची २ हजार ३४४ क्विंटल आवक नोंदवली गेली. बाजार समितीत लिलाव पद्धतीने झालेल्या खरेदीत गावरान कांद्याला प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल
लाल कांद्याच्या २० गोण्यांच्या लॉटला ५५०० रुपये भाव
अहिल्यानगर बाजार समितीत काही लॉटमधील दर्जेदार कांद्याला अपवादात्मक व उच्चांकी दर मिळाला. यामध्ये गावरान कांद्याच्या ५५ गोण्यांच्या लॉटला प्रतिक्विंटल ४८०० रुपये, तर गावरान कांद्याच्या १५ गोण्यांच्या लॉटला प्रतिक्विंटल ५००० रुपये भाव मिळाला. तर लाल कांद्याच्या ४९ गोण्यांच्या लॉटला प्रतिक्विंटल ५४०० रुपये, तर २० गोण्यांच्या लॉटला प्रतिक्विंटल ५५०० रुपये असा उच्चांकी भाव मिळाला.
किमान १००० ते जास्तीत जास्त ४७०० रुपये, तर सरासरी २८५० रुपये भाव मिळाला.
तसेच लाल कांद्याला प्रतिक्विंटल किमान १५०० ते जास्तीत जास्त ४९०० रुपये, तर सरासरी ३२०० रुपये दर मिळाला. बाजार समितीत शेतमालाची विक्री जाहीर लिलाव पद्धतीने होत असल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल प्रतवारी करून आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
टोमॅटोला १५०० रुपये, तर गवारीला प्रतिक्विंटल १० हजारांचा भाव
लसूण, आद्रकचे भाव कडाडले
अहिल्यानगर : येथील कृषी
उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला विभागात शनिवारी विविध भाजीपाल्याची १७२३ क्विंटल आवक झाली. बाजारात आज लसणाची १५ क्विंटल आवक झाली असून त्याला प्रतीक्विंटल ६००० ते २०००० रुपये असा उच्चांकी भाव मिळाला, तर २३ क्विंटल आवक झालेल्या आद्रकला ५६०० ते ८००० रुपये (सरासरी ६८०० रुपये) भाव मिळाला. ९ क्विंटल आवक झालेल्या गवारीला २५०० ते १०००० रुपये (सरासरी ६२५० रु.) असा चांगला दर मिळाला.
अहिल्यानगर बाजार समितीत
३२७ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला प्रतिक्विंटल २०० ते १५०० रुपये भाव मिळाला. ४६ क्विंल आवक झालेल्या वांग्याला ५०० ते ४००० रुपये
मेथी जुडीला ३३ रुपयांपर्यंत भाव
पालेभाज्यांच्या आवकेत मेथीची १६९३ जुडी आवक होऊन मेथीला प्रतिजुडी २० ते ३३ रुपये भाव मिळाला. कोथिंबिरीची १२ हजार ७८० जुडी आवक होऊन तिला प्रतिजुडी ८ ते २० रुपये भाव मिळाला. ७८० जुडी आवक झालेल्या पालक जुडीला ५ ते १० रुपये भाव मिळाला. शेपू भाजीच्या १५६३ जुडी आवक होऊन प्रतीजुडी ८ ते १५ रुपये भाव मिळाला आहे.
भाव मिळाला. कोबीची ११७क्विंटल आवक झाली, कोबीला प्रतिक्विंटल २०० ते १००० रुपये भाव मिळाला. फ्लॉवरची ११० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल
८०० ते ३००० रुपये भाव मिळाला. याशिवाय ९० क्विंटल आवक झालेल्या काकडीला ५०० ते २५०० रुपये, ५९ क्विंटल आवक झालेल्या भेंडीला १००० ते ३५००
रुपये भाव मिळाला. बटाट्याची सर्वाधिक ४४२ क्विंटल आवक झाली होती. यावेळी बटाट्याला प्रतिक्विंटल ७०० ते १८०० भाव मिळाला. हिरव्या मिरचीची ११४ क्विंटल आवक होऊन मिरचीला प्रतिक्विंटल ३००० ते ६००० रुपये भाव मिळाला. शेवग्याची १३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १८०० ते ५००० रुपये भाव मिळाला. गाजराची २१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १८०० ते ३००० रुपये भाव मिळाला. लिंबाची १४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ८५०० रुपये असा बाजारभाव मिळाला.
Tags :
22425
10




