महाराष्ट्र
12373
10
स्व.राजीवजी राजळे यांच्या स्मृतींना उजाळा देत ‘जीवन कौशल्यां’वर
By Admin
स्व.राजीवजी राजळे यांच्या स्मृतींना उजाळा देत ‘जीवन कौशल्यां’वर प्रेरणादायी व्याख्यान
नगर सिटीझन न्यूज नेटवर्क-
आदिनाथनगर : स्वर्गीय आमदार राजीवजी राजळे यांच्या नवव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज सर्वत्र विविध सामाजिक, शैक्षणिक व विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दादापाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालय, आदिनाथनगर येथे प्लेसमेंट सेल व करिअर कट्टा यांच्या वतीने विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते डॉ. मंगेश वाघमारे,न्यू आर्ट्स कॉलेज, अहिल्यानगर व सदस्य, वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यास मंडळ (BOS), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी स्व. राजीवजी राजळे यांच्या स्मृतींना उजाळा देत ‘२१ व्या शतकातील जीवन कौशल्ये’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अत्यंत मनोरंजनात्मक, संवादात्मक व प्रभावी शैलीत मांडलेल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडत जीवनातील विविध प्रसंगांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा देण्यात आली. त्यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य शिकून घेऊन आपले यशस्वी जीवन करावे असा संदेश दिला. 21 व्या शतकात प्रगती करायची असेल व स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य स्वतःमध्ये विकसित करणे आवश्यक आहे असे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मा. बाबासाहेब किलबिले होते. यावेळी दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्रीकांत मिसाळ, प्रभारी प्राचार्य डॉ. एम. एस. तांबोळी, कार्यालयीन अधीक्षक विक्रम राजळे, सामाजिक कार्यकर्ते गवळी साहेब, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अशोक काळे, कृषी विद्यालयाचे प्राचार्य सुनील पानखडे, लोकनेते आप्पासाहेब राजळे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. शांताराम खणगे, प्राध्यापक श्यामराव गरड तसेच दादापाटील राजळे शिक्षण संस्थेतील सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम .एस. तांबोळी यांनी केले. आपल्या प्रास्ताविक पर भाषणात त्यांनी स्वर्गीय राजीवजी राजळे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू सांगितले विशेषतः त्यांच्याकडे असणारे संभाषण कौशल्य, प्रत्येक विषयाचे प्रगाढ ज्ञान तसेच ग्रंथ वाचनाविषयी असणाऱ्या आवडीबद्दल सांगितले. कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना डॉ.अशोक देसाई यांनी तर अनुमोदन संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. चंद्रकांत पानसरे यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोरकुमार गायकवाड यांनी केले, तर प्रा. प्रदीप धनवडे यांनी आभार प्रदर्शन केले.
स्व. राजीवजी राजळे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व विकासाभिमुख कार्याच्या स्मृतींना उजाळा देत विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून प्रभावी संवाद, निर्णयक्षमता, नेतृत्व, वेळेचे नियोजन, सकारात्मक विचारसरणी आणि आत्मविश्वास यांसारख्या जीवन कौशल्यांची आवश्यकता असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर . जे. टेमकर यांनी मार्गदर्शन केले
Tags :
12373
10




