महाराष्ट्र
336
10
कासार पिंपळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.सोसायटी
By Admin
कासार पिंपळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.सोसायटी बैठक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
पाथर्डी तालुका न्यूज नेटवर्क-
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.सोसायटी बैठक सभा खेळीमेळीच्या वातावरणात (दि.१०) संपन्न झाली.यावेळी चेअरमन वसंतराव भगत,सचिव, देविदास केळकर,व्हा.चेअरमन संभाजी गोविंद राजळे,विक्रम राजळे,
संभाजी राजळे,पञकार अमोल म्हस्के यावेळी उपस्थित होते.सभासदाना वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस देण्यात आली होती. संस्थेची ८० वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २७/९/२०२६ विठ्ठल रुखमिणी मंदिर सभामंडप मध्ये मा. चेअरमन वसंतराव परसराम भगत यांच्या अध्यक्षतेखाली खालील विषयांचा विचार करणे माठी आयोजित करण्यात आली.
वार्षिक सभेपुढील विषय घेण्यात आले. सभेचे नोटीस वाचून मंजूर केली.दि. २०/९/ २०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचन करण्यातआले.
संस्थेची सन २०२५-२०२६ चे आर्थिक पत्रके वाचन करण्यात आले. सन२०२६- २०२७ साला करिता अंदाजपत्रक तयार करून मंजूर करणे व सन २०२५-२०२६ अहवाल काळात कमी-जास्त झालेल्या खर्चास मंजुरी संदर्भात विचार विनीमय करण्यात आला. बाहेरील कर्ज उभारायचे अधिकार पंच कमिटीस देण्यात आले. सन २०२५-२०२६ चा ऑडिट मेमो वाचून मंजूरी संदर्भात व सन २०२४- २०२५ चा ऑडिट मेमो दोष दुरुस्ती अहवाल वाचन करण्यात आले. सन २०२६- २०२७ या आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षण करणे साठी मा. लेखापरीक्षकाची नेमणूक करण्यासंदर्भात चर्चा झाली. दि. २७/९/२०२६ रोजीचे वार्षिक सर्वसाधारण सभेस सहभाग न घेतलेल्या सभासदांची अनुपस्थितीची नोंद घेऊन त्यास मान्यता
देणे संदर्भात विचार विनिमय झाला.सभासदांचे प्रश्न अडचणी संदर्भात ऐन वेळी येणाऱ्या काही विषयावर चर्चा झाली.या प्रमुख प्रश्नामध्ये शेतकरी कर्जमाफी,पाट-पाणी संदर्भात चर्चा,कर्ज योजना,शेतकऱ्यां संदर्भात योजना सभासदामध्ये चर्चा झाली.
यावेळी शेतकरी, कर्ज, कर्जमाफी, पाटाच्या पाण्याचे नियोजन तसेच सोसायटीच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा झाली.
ज्या सभासदांच्या नावावर जमीन नाही, अशा सभासदांची नावे सभासद यादीतून वगळण्याची मागणी केली होती. त्यानुसार १५२ सभासदांची नावे यादीतून वगळण्यात आली.
यंदाच्या सभेत त्यांनी दुष्काळी परिस्थिती, पाटाला उपलब्ध असलेले पाणी शेतकऱ्यांना पिकांसाठी मिळणे, गावातील १६६ सभासदांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याची, तर नियमित कर्जफेड करणारे इतर सभासद त्यातून वंचित राहिल्याची माहिती सभेत चर्चेत आली. सोसायटी तोट्यात असल्याने यंदा लाभांश देता आला नसल्याचेही सांगण्यात आले.
यावेळी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी आमदार मा.मोनिकावहिनी राजळे यांच्याबाबत शुभेच्छा ठराव करण्यात आला.
संदीप राजळे यांनी आपल्या मनोगतात आमदार मोनिकाताई राजळे यांनी बँकेच्या संचालकपदासोबतच भविष्यात बँकेच्या पहिल्या महिला चेअरमनपदाची जबाबदारीही घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
मा.चेअरमन वसंतराव भगत व सर्व संचालक मंडळाच्या आदेशानुसार सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.यावेळी श्री. वसंतराव परसराम भगत,व्हा.चेअरमन संभाजी गोविंद राजळे,पञकार अमोलराजे म्हस्के सोसायटी सदस्य विक्रम बलभिम राजळे,संभाजी ठकाजी राजळे, रामभाऊ कवळे, विनायक माणिक भगत, व्दारकानाथ विठ्ठल म्हस्के, सदाशिव केरु बापू तुपे, श्री. दत्तात्रय बाबुराव शेळके, तसेच सभासद रामदास म्हस्के, राधाकिसन राजळे,सोपानराव तुपे, मेजर ज्ञानदेव जगताप, संदिप राजळे,गणेश भगत,बेरड सर,दिलीप राजळे,नानासाहेब देशमुख,राम राजळे,अशोक भगत,श्री. देविदास केळकर (सचिव), श्री. राम आठरे (क्लार्क)दिपक देशमुख यावेळी उपस्थित होते.
Tags :
336
10




