केळवंडी येथे वाघाचा बैलावर हल्ला; बैल ठार
शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
पाथर्डी : तालुक्यातील केळवंडी येथे आज दुपारी वाघाने बैलावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली. अशोक बापूराव आठरे यांच्या मालकीच्या बैलावर वाघाने हल्ला केला.
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वनविभागाने घटनेची तातडीने दखल घेऊन परिसरात गस्त वाढवावी तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.