महाराष्ट्र
20609
10
पाथर्डी तालुक्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची पायमल्ली !
By Admin
पाथर्डी तालुक्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची पायमल्ली !
पाथर्डी तालुक्यात अल्पवयीन मुलीचे बालविवाह मोठ्या प्रमाणावर होत आहेत. बालविवाह प्रतिबंधक कायद्याची पायमल्ली होत असताना सरकारी यंत्रणा मूग गिळून गप्प आहे. तालुका बालसंरक्षक समिती, विविध गावांतील ग्रामविकास अधिकारी व सरपंच मंडळीदेखील त्यांच्या कामात बेजबाबदारपणा करीत आहेत.
जिल्हाधिकारी यांनीच विशेष बाब म्हणून तालुक्यातील बालविवाह रोखण्यासाठी संबधीत यंत्रणेला धारेवर धरले पाहिजे, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याची कडक अमंलबजावणी करणे गरजेचे आहे. गेल्या एक महिनाभरात बालविवाह होऊन दहा गरोदर माता बनलेल्या युवती समोर आल्या आहेत. पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दर शनिवारी गरोदर मातांची तपासणी केली जाते. त्यातून अनेक बालविवाह होऊन अठरा वर्षापूर्वीच गरोदर असलेल्या माता तपासणीत आढळून येत आहेत. उपजिल्हा रुग्णालयातून वैद्यकीय अधिकारी अल्पवयीन गरोदर मातांची माहिती पोलीस ठाण्यात दिली जाते. मात्र, बालविवाह झाल्याची नोंद मात्र कुठेच नसते. पोलीसही याकडे जास्त गांभीर्याने पाहत नाहीत. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांत माहिती
दिल्यानंतर चौकशी झाली तर बालविवाह झाल्याचा गुन्हा दाखल होईल. मात्र, अशी कोणतीही चौकशी होत नाही. शेकडो मेमो पोलिसांकडे पडून आहेत. बालविवाह रोखणे हे सामाजिक स्वास्थ्यासाठी गरजेचे आहे. तालुका स्तरावर गेल्या तीन वर्षांपासून बालसंरक्षण समितीच अस्तित्वात नाही. तहसीलदार या समितीचे प्रमुख असतात. एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी या समितीच्या सचिव असतात. तालुक्यातील एक सरपंच, एक पोलीस पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, गटशिक्षणाधिकारी यांचे प्रतिनिधी, विद्यार्थिनी प्रतिनिधी व स्वंयसेवी संस्थांचे एक प्रतिनिधी, अशी ही समिती असते. समितीच्या महिन्याला बैठका होऊन आढावा घेणे गरजेचे असते. आतापर्यंत अशा बैठका झालेल्या नाहीत. तालुक्यातील डमाळवाडी, माणिक दौंडी, शेकटे, कुत्तरवाडी, पाथर्डी शहरातील तीन अशा सुमारे दहा अल्पवयीन गरोदर माता उपजिल्हा रुग्णालयातील तापासणीमध्ये आढळ्या आहेत. पोलिसांकडे त्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी
सादर केलेला आहे. मात्र, यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. पोलीस म्हणतात हा गुन्हा दाखल करण्याचे काम ग्रामविकास अधिकाऱ्यांचे आहे. ग्रामविकास अधिकारी म्हणतात आमच्या गावात बालविवाह झालेला नाही किंवा त्याचा पुरावा आमच्याकडे नाही. त्या गावातील कोण मुलगी विवाह करून बाहेर गेली याची नोंददेखील गावात कुठेही आढळत नाही. बालविवाहाचे परिणाम इतके वाईट असतात की मुलीची तर आरोग्यविषयक व शारीरिक अडचण होतेच आणि दोन कुंटुबातील व्यक्तीदेखील त्यामुळे कायद्याच्या कचाट्यात सापडतात. अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या बालविवाह प्रतिबंधक मोहिमेतील पथके याबाबत सजग राहून काम करतात.
बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कडक मंलबाजवणीसाठी ते पाठपुरावा करून ग्रामविकास अधिकारी, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा यांच्याशी समन्वय साधून गुन्हा दाखल हकरणे, मुलींचे व तिच्या कुटुंबाचे समुपदेशन करणे, कायदेशीर
तालुक्यात ज्या दहा अल्पवयीन गरोदर माता सापडल्या आहेत. त्यांच्या बालविवाहाचे गुन्हे कधी दाखल होणार? हे गुन्हे कोण दाखल करणार ? याचा तपास किती कालावधीत पूर्ण होणार ? या प्रश्नांची उत्तरे मिळण्यास उशीर होईल. मात्र, त्याचा पाठपुरावा सुरू राहील. याबाबत घरभेटी देऊन चौकशी केली जाईल. चौकशीत जे समोर येईल त्यानंतर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधीत ग्रामविकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील. - प्रवीण कदम, स्नेहालय, अहिल्यानगर.
बाबी पाहणे अशी कामे ही टीम सामुहिकपणे निस्वार्थ वृत्तीने करते. प्रविण कदम व त्यांचे सहकारी हे काम निकराने करीत आहेत. त्यांना शासकीय यंत्रणेकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नाही. प्रबोधन करणे, जागृती मेळावे, बैठका घेणे ही प्राथमिक कामे करीत आहेत. तालुक्यात या कामासाठी बालसरंक्षण समिती व ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका व आरोग्य अधिकारी अशी बैठक घेऊन याबाबत जागृती मोहीम करणे गरजेचे आहे.
Tags :
20609
10




