संतांचे विचार आचरणात आणावेत -ह.भ.प.राजकुमार घुले
पाथर्डी सिटीन्यूज नेटवर्क
मानवता हा धर्म आहे, जो दुसऱ्या व्यक्तीचे दुःख जाणून घेत नाही त्याची प्रगती होत नाही. असे विचार ह. भ. प. प्रा. डॉ.राजकुमार घुले यांनी व्यक्त केले.पाथर्डी तालुक्यातील महिंदा येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित कीर्तन सेवेत बोलत होते. मनुष्य देह ही काही पुन्हा पुन्हा मिळणारी गोष्ट नाही तेव्हा या जन्माचे सार्थक केले पाहिजे लोभीपणाने वागू नका, अति ईच्छेमुळेच सर्व दुःखाची उत्पत्ती होते. समाधानाने जगायचे शिका. परोपकाराने पुण्य लाभते तर परपीडणाने पाप लागते, तेव्हा परोपकार करा. नेहमी मुखी राम कृष्ण हरी नाम घ्या त्यामुळे आपला देह पवित्र होतो. सर्व प्राणी मात्रांवर दया करा या संत विचाराची आज समाजाला गरज आहे. सध्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व चाऱ्याची व्यवस्था करावी असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी संस्थांनाचे संस्थापक ह. भ. प. प्रा. डॉ.सुभाष शेकडे, सौ. गीताताई शेकडे, ह. भ. प. शिवाजी वारे, प्रा. डॉ. सुमित्रा घुले, बाळासाहेब फुंदे, राजेंद्र बडे, बबनराव टिळेकर, पांडुरंग गोसावी,दिलीप खेडकर, रमेश कांबळे, गोरक्ष दहिफळे, मारुती दहिफळे, प्रल्हाद मगर तसेच महिंदा व विठ्ठलवाडी या गावचे ग्रामस्थ, महिला मंडळ व भजनी मंडळ मोठ्या संखेने उपस्थित होते. श्री निवृत्ती दहिफळे यांनी अन्नदानाची व्यवस्था केली.