पाथर्डी-तीसगाव रोडवर पीक अप वाहन व एका दुचाकीचा जोरदार अपघात
पाथर्डी न्यूज नेटवर्क-
पाथर्डी तालुक्यातील माळी बाभूळगाव शिवारात हॉटेल मधुबन समोर पीक अप वाहन व एका दुचाकीचा जोरदार अपघात झाल्याची घटना घडली.
झालेल्या अपघातात तालुक्यातील किर्तनवाडी येथील रहिवासी आबासाहेब उर्फ बाळु किर्तने यांचा मृत्यू झाला आहे. तर आजिनाथ किर्तने हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.