पाथर्डी येथे सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद
पाथर्डी- प्रतिनिधी
अहिल्यानगर व पाथर्डी येथे सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. विनोद जिजाबा भोसले (वय २६, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड) असे जेरबंद आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पथकाने तपासकामी ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगठणातील पाकळ्या व मनी, ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल, ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचा मिनीगंठण तुकडा, मोटारसायकल, एक मोबाईल असा एकुण तीन लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.