महाराष्ट्र
69011
10
पाथर्डीत कडकडीत बंद; सर्वपक्षीय कार्यकर्त्याचा तहसीलवर
By Admin
पाथर्डीत कडकडीत बंद; सर्वपक्षीय कार्यकर्त्याचा तहसीलवर मोर्चा
दरोड्यातील गुन्हेगारांना मोक्का लावा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील
टाकळीमानूर व तारकेश्वर गडावरील
दरोड्यातील गुन्हेगारांना मोक्का लावावा, शहरातील गुन्हेगारी रोखावी, खिसेकापू, बेकायदा सावकारकी, मोबाईल व दागिने चोर आणि मुली व महिलांची छेडछाड हे सर्व प्रकार थांबवावेत, या मागणीसाठी गुरुवारी पाथर्डी शहर शंभर टक्के बंद ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी केले.
येथील डॉ. बाबासाहेब आबेंडकर चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चात अॅड. प्रतापराव ढाकणे, बाबासाहेब ढाकणे, विष्णुपंत ढाकणे, गहिनीनाथ दादा शिरसाट, भगवानराव दराडे, शिवशंकर राजळे, बंडू पाटील बोरुडे, सिताराम बोरुडे, विजय आव्हाड, दत्ताभाऊ खेडकर, देवीदास खेडकर, भाजपाचे अशोकराव चोरमले, अशोक गर्जे, माणिकराव खेडकर, उद्धव दुसंग, वैभव दहिफळे, राजू जगडखैर, मनिषा ढाकणे, वंदना ढाकणे, मनिषा घुले, उषा खेडकर, अर्जुन धावतडक, रणजीत बेळगे, महादेव दहीफळे, दिनकर पालवे, योगेश रासणे, देवा पवार, उद्धव माने, महेंद्र शिरसाट यांच्यासह व्यापारी, नागरिक व महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. पोलिस ठाण्यात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. तेथे शहरातील गुन्हेगारी रोखवी, खिसेकापू, बेकायदा सावकारकी, मोबाईल व दागिने चोर आणि मुली व महिलांची छेडछाड हे सर्व प्रकार थांबवावेत, अशा मागण्या भाषणातून करण्यात आल्या. या वेळी ज्यांच्या घरावर दरोडा पडला ते बाबासाहेव ढाकणे यांनी त्यांच्यावर
पाथर्डीत कडकडीत बंद; सर्वपक्षीय कार्यकर्त्याचा तहसीलवर मोर्चा
दरोडा पडला, पोलिसांनी दोन दिवसात आरोपींचा शोध लावला. अनेक पुढाऱ्यांचे पोलिसांना फोन आले, पण पोलिस दबावाला बळी पडले नाहीत.
बेतलेला प्रसंग सांगून गुन्हेगारी संपवण्याचे आवाहन केले. यावेळी अॅड. प्रतापराव ढाकणे म्हणाले, कानुन के हाथ बहुत लंबे होते है, हे जनतेला पोलिसांनी दाखवुन द्यावे, ढाकणे यांनी सर्वपक्षीय नेते व कार्यकत्यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांचा गुन्हेगारांना पकडल्याबद्दल सत्कार केला. गुन्हेगारी प्रवृत्ती समाजाला घातक असते. दहशतीखाली असलेला तालुका पोलिसांनी मनावर घेतले तर भयमुक्त होऊ शकतो. व्यापारी वर्ग भितीखाली जगतोय. दागिन्यांची चोरी, छेडछाड हे प्रकार गंभीर आहेत. पोलिस निरीक्षक मुटकुळे साहेब तुम्ही पाथर्डी साफ व भयमुक्त करा, आम्ही तुमच्या पाठीशी राहू. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्पुमख विष्णुपंत ढाकणे म्हणाले, आमच्या घरावर
पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे म्हणाले, गुन्हेगार कोणीही, असो त्याला कारवाईला सामोरे जावेच लागेल. सहा जणांना अटक केली असून, तीन जणांचा शोध सुरु आहे. खऱ्या आरोपींना समाजासमोर आणून कडक कारवाई करु. मोक्का लावण्याबाबत नियमांची पूर्तता करण्याचे काम करु. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे, जगदिश मुलगीर, शिवाजी तांबे, उपनिरीक्षक सचिन लिमकर, विलास जाधव यांनी सहकाऱ्यांसह बंदोबस्त ठेवला.
Tags :

