एलसीबीचा दणका; नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या २७ जणांविरुद्ध कारवाई
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गेल्या सोमवारी
मकरसंक्रातीचा सण उत्साहात झाला. मात्र मकरसंक्रातीनिमित्ताने पतंग उडविताना नायलॉन मांजामुळे अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यात विक्रीस बंदी असलेल्या चायना नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या २७ जणांविरुद्ध कारवाई केली आहे. त्यांच्या ताब्यातून विविध कंपनीचा १ लाख ८८ हजार १० रुपये किंमतीचा २७६ नग मांजा तसेच मांजा गुंडाळण्याचे मशिन जप्त केले. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना, राहाता, श्रीरामपूर शहर, संगमनेर
शहर, पाथर्डी, कोतवाली, शेवगाव, राहुरी कॅम्प व एमआयडीसी पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला,
अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, स्वाती भोर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर यांच्या टीमने ही कामगिरी केली.