पन्नास लाखांच्या खंडणीसाठी पुण्यात तीन जणांचे अपहरण, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून आरोपी जेरबंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी तीन जणांचे अपहरण (Abduction) झाल्याची घटना घडली.
पुण्यातील मार्केट यार्ड (Pune Market Yard) परिसरातून अपहरण झाले आहे. या गुन्ह्यातील आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Ahmednagar Crime Branch) जेरबंद केले आहे. अपहरण केलेल्या तीन जणांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सुखरुप सुटका केली आहे. खंडणीचे पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देवून आरोपींनी तीन जणांना मारहाण केली होती.
पुण्यातून हर्षप्रताप राजपुत, प्रतिष जगदाळे आणि किसनकुमार गुप्ता या तीन जणांचा अपहरण करण्यात आले होते. त्यांना 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. मात्र, अखेर अपहरण करणाऱ्या आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.