रामलिंग सेवाधाम येथील वारकरी संप्रदयाकडून धार्मिक पद्धतीने गणराया बाप्पा ला निरोप
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपरी हे गाव नेहमी सर्व धर्म भाव गुण्या-गोविंदाने विकासत्मक निर्णय घेत असतात. याच कळसपिंपरी गावामध्ये तरुणाने डीजे वाजन्याला फाटा देऊन नवा आदर्श समोर ठेऊन बाप्पा ला निरोप देताना गावातील सर्व भजनी मंडळ व गावातील सर्व तरुण, महिला मंडळ यांनी एकत्र येऊन भजन गायन करून फुगड्या खेळून आनंदात बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला.
यावेळी रामलिंग सेवाधाम येथील मठाधीपती रामायणचार्य ह.भ.प. लक्ष्मण महाराज भवार, वृक्षप्रेमी पुरस्कार प्राप्त मा.सरपंच दिगंबर भवार, मंडळाचे अध्यक्ष राहुल बुळे, बबन भवार, गोविंद गणगे,विशाल शेळके, संजय मिसाळ सोमनाथ भवार गणेश मापारे नितीन भवार, गणेश भवार आदी तरुण मित्र उपस्थित होते.