जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या
By Admin
नगर जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा गेल्या 3-4 महिन्यांपासून सुरू होती. अधिकाऱ्यांनाही बदलीचे वेध लागले होते. अखेर मंगळवारी (दि. 28) रात्री जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी बदल्यांचे आदेश काढले आहेत.
यामध्ये 33 पोलीस निरीक्षक, तर 15 सहायक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील बहुतेक पोलीस ठाण्यांना नवीन अधिकारी मिळाले आहेत. दरम्यान, या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये असलेले प्रभारी राज संपुष्टात आले आहे.
बदल्या झालेले अधिकारी कंसात जुने ठिकाण आणि बदली झालेले पोलीस स्टेशन
पोलीस निरीक्षक ः चंद्रशेखर यादव (कर्जत) कोतवाली नगर शहर, मधुकर साळवे (जिविशा, नगर)- तोफखाना पोलीस ठाणे, ज्योती गडकरी (तोफखाना नगर शहर)- सुपे, संभाजी गायकवाड (जामखेड)- पारनेर, ज्ञानेश्वर भोसले (सायबर)- श्रीगोंदा, विजय करे (नेवासा)- कर्जत, महेश पाटील- जामखेड पोलीस स्टेशन, संजय ठेंगे- बेलवंडी, संतोष मुटकुळे- पाथर्डी, शिवाजी डोईफोडे- नेवासा, हर्षवर्धन गवळी- श्रीरामपूर शहर, दशरथ चौधरी- श्रीरामपूर तालुका, मेघश्याम डांगे (नियंत्रण कक्ष)- राहुरी, नंदकुमार दुधाळ- शिर्डी, गुलाबराव पाटील (शिर्डी)- वाहतूक शाखा, शिर्डी, रामराव ढिकले (श्रीगोंदा)- श्रीगोंदा शहर, वासुदेव
देसले (कोपरगाव शहर)- कोपरगाव तालुका, भगवान मथुरे- संगमनेर शहर, देवीदास ढुमणे- संगमनेर तालुका, संतोष खेडकर - घारगाव, सुभाष भोईर (आश्वी)- अकोले, संतोष भंडारे - आश्वी, मोरेश्वर पेंदाम (जिविशा, नगर)- नगर शहर वाहतूक शाखा, चंद्रकांत मिरावडे- जिल्हा वाहतूक शाखा, दिनेश आहेर -सायबर, मच्छिंद्र खाडे (नियंत्रण कक्ष)- मानव संसाधन, सुहास चव्हाण (पाथर्डी)- आर्थिक गुन्हे शाखा, अरुण आव्हाड- आर्थिक गुन्हे शाखा, घनश्याम बळप (पारनेर)- वाचक, पोलीस अधीक्षक, संपदा शिंदे (कोतवाली) - जिविशा, राजेंद्र भोसले (अर्ज शाखा) - जिविशा, राजेंद्र इंगळे - साई मंदिर सुरक्षा, नितीन गोकावे (सुपे) - टीएमसी, नगर.
सहायक पोलीस निरीक्षक ः दिनकर मुंडे (स्थानिक गुन्हे शाखा)-भिंगार, युवराज आठरे (एमआयडीसी)- लोणी, महेश जानकर (श्रीगोंदा)-खर्डा, कैलास वाघ (शहर वाहतूक शाखा) तोफखाना, समाधान पाटील (लोणी)- शिर्डी, गणेश इंगळे (स्थानिक गुन्हे शाखा)- राजूर, माणिक चौधरी - सोनई, प्रकाश पाटील (खर्डा)- अर्ज शाखा, नगर, ज्ञानेश्वर थोरात (श्रीरामपूर तालुका)- नेवासा, गणेश वारुळे- स्थानिक गुन्हे शाखा, राजेंद्र पवार- संगमनेर शहर, राजू लोखंडे- राहुरी, अरुण भिसे (नियंत्रण कक्ष)- शिर्डी वाहतूक शाखा, राजेंद्र सानप (नगर तालुका)- एमआयडीसी, शिरीषकुमार देशमुख (भिंगार)- नगर तालुका.
काल बदली; आज निलंबन
सुपा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरणकुमार गोकावे यांच्या बदलीचे आदेश काल सायंकाळी उशिरा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले. त्यानुसार त्यांची बदली मुख्यालयातील टीएमसी (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सेंटर) शाखेत करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. मात्र, बदली आदेश हातात पडण्यापूर्वीच महिलेला कथितरीत्या मारहाण करण्याचा व्हिडीओ समोर आला आणि गोकावे यांच्या निलंबनाचे आदेश थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी काढले आहेत.
एलसीबीला प्रतीक्षाच
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काल पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची काही दिवसांपूर्वीच बदली झाली होती. मात्र, त्यांचा पदभार अद्यापि कुणाकडेही देण्यात आलेला नाही. काल झालेल्या बदल्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा (एलसीबी) पदभार कुणाकडेही देण्यात आलेला नसल्याने एलसीबीला पोलीस निरीक्षकांची प्रतीक्षाच असल्याचे समोर आले आहे.
70697
10





