महाराष्ट्र
33467
10
शैक्षणिक कामासाठी पैसे माघितल्याची एकही तक्रार माझ्याकडे येता कामा
By Admin
सिन्नर-शैक्षणिक कामासाठी
पैसे माघितल्याची एकही तक्रार माझ्याकडे येता कामा नये.दिपक केसरकर
आदिवासी मुलांचा जो हक्क आहे तो त्यांच्यापर्यंत पोहचला पाहिजे.
सिन्नर तालुका- प्रतिनिधी
शिक्षण मंत्र्याच्या उपस्थितीत गुणगौरव सोहळा, शिवनिका संस्थान पुढाकार
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे शिवनिका संस्थांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण ब्रम्हांड शास्त्र व शिवनिका संस्थांचे अध्यक्ष कॅप्टन अशोक खरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण मंत्री दिपक केसरकर व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष तथा शिवनिका संस्थांचे संचालिका रूपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गुणगौरव सोहळा पार पडला यावेळी इयत्ता आठवी ते दहावी व इयत्ता दहावी ते बारावी तील विद्यार्थ्यांचा परिसरातील शाळेतील उत्कृष्ट विद्यार्थी व उत्कृष्ट मुख्याध्यापक तसेच आदर्श शिक्षक यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती असलेले जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थाचे भगवान खारके, नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, भास्करराव पाटील, वेतन विभागाच्या अधिक्षिका प्रीती पवार, नागेश पोद्दार भारत कोकाटे, अरुण वाघ,अरुण येवले, एसडी जाधव इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थापक संभाजी जाधव, गोडगे पाटील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता तिवारी, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा गुणगौरव सोहळा संपन्न झाला यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली त्यात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री यांनी आपल्या मनोगता शिक्षण विभाग घोटाळा विषयी उपस्थित अधिकारी व शिक्षकांना शैक्षणिक विभागाच्या अधिकाऱ्यांना माझे सक्त आदेश दिले आहेत शैक्षणिक कामासाठी
पैसे माघितल्याची एकही तक्रार माझ्याकडे येता कामा नये...
असे जर कोणी आढळून आले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल व त्याचबरोबरआदिवासी विद्यार्थांच्या जेवणाबाबत आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगेल आदेश काढले आहेत
आदिवासी मुलांचा जो हक्क आहे तो त्यांच्यापर्यंत पोहचला पाहिजे शालेय विद्यार्थी हा शिक्षणाचा पाया असून येत्या काही दिवसात मी 17000 राज्य शासनाच्या वतीने बाल वाटिका सेविकांना प्रशिक्षण देऊन त्या शाळा सुद्धा शैक्षणिक क्षेत्रात कशा आणता येईल यावर विचार करत असून विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तका सहित यावर्षी इयत्ता आठवी पर्यंत मोफत व यांचे वाटप देखील करण्यात येणार असून त्याचबरोबर केवळ दोन गणवेश नसून विद्यार्थ्यांना बूट आणि सॉक्स याची देखील तरतूद करण्यात आली आहे व त्याचे प्रत्यक्ष वाटप देखील करण्यात येणार आहे यावेळी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते
शिवनीका संस्थांच्या परिसरातील पाथरे, सायाळे, वावी ,शहा, देवपूर, पंचाळे आधी शाळेतील गुणवंत विद्यार्थी यांचा ट्रॉफी व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्यातील आदर्श शिक्षक म्हणून मोहिनी मच्छिंद्र यादव, कैलास ज्ञानदेव वर्पे, ज्ञानेश्वर नामदेव वाघ, गजानन छगन नरोडे, ज्ञानेश्वर म्हाळू आंधळे, गणेश सुरेश चंद्रजी मालपाणी, रमेश माधवराव हिंगे , अतुल सोमनाथ निळकंठ, जितेंद्र काशिनाथ आहेर, आधी शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवनिका संस्थांचे संचालक नामकर्ण आवारे यांनी केले व सूत्रसंचालन नवनाथ सुडके सर यांनी केले तर आभार संस्थांचे विश्वस्त सुभाषराव गमे यांनी व्यक्त केले
Tags :
33467
10





