महाराष्ट्र
52520
10
शिंदे गट आणि भाजप नेत्यांमध्ये तुफान राडा; दगडफेकीमुळे परिसरात तणाव
By Admin
शिंदे गट आणि भाजप नेत्यांमध्ये तुफान राडा; दगडफेकीमुळे परिसरात तणाव
अहमदनगर शहरातील घटना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगरमध्ये एका लग्नसमारंभात शिंदे गट आणि भाजप नेते आपापसात भिडल्याचं समोर आले आहे.
एकमेकांना खुन्नस दिल्याच्या रागातून दोन्ही गटातील नेत्यांमध्ये हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.
यानंतर भाजप नेते आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाने शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांच्या मुलाच्या हॉटेलवर दगडफेक केली ज्यामुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या राड्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी नगर - पुणे महामार्ग रोकून धरल्याने महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
नेमकं घडलं काय?
भाजप नेते आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांचा मुलगा अक्षय कर्डीले केडगावमधील एका लग्नसमारंभासाठी गेला होता. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांच्या मुलाशी त्याची नजरानजर झाली, यावेळी दोघांनी एकमेकांवर खुन्नस दिल्याच्या आरोप केला. यानंतर लग्नसमारंभ पार पडल्यानंतर अक्षय कर्डीलेने कार्यकर्त्यांसह दिलीप सातपुते यांच्या मुलाच्या केडगावमधील हॉटेलवर तुफान दगडफेक केली, दरम्यान सातपुते यांच्या समर्थकांनीही कर्डीलेंच्या समर्थकांवर दगडफेक करत प्रत्युत्तकर दिले. यामुळे शहरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.
अहमदनगरमधील केडगावमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी घेत सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या या प्रकरणातील हस्तक्षेपानंतर सर्व वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. राडा आणि दगडफेकीच्या घटनेनंतर परिसरातील तणावपूर्ण वातावरण आता शांत झाले आहे.
मंगळवारी रात्री एका हॉटेलवर दगडफेक केल्याने दुसऱ्या गटाने पुणे महामार्गावर ठाण मांडत कारवाईची मागणी केली. दरम्यान, कोतवाली पोलिसांचा मोठा फौजफाटा केडगावात पोहोचला असून, याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय व शिवसेनेचे शहरप्रमुख (बाळासाहेबांची शिवसेना) दिलीप सातपुते यांचे चिरंजीव ओमकार यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये एका लग्नसमारंभात सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास वाद झाला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी केडगाव येथे मोठा बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस बंदोबस्त असतानाही मोटारसायकलवरून आलेल्या ८ ते १० जणांनी केडगाव येथील शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या हॉटेलवर दगडफेक केली. या दगडफेकीत काही वाहनांच्या काचा फुटल्या. त्यामुळे दुसऱ्या गटाने दगडफेक करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी पुणे महामार्गावर ठिय्या मांडला.
दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे. त्यामुळे जागेवरच फिर्याद घेता येणार नाही. त्यासाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल, अशी माहिती दिली. पोलिसांशी झालेल्या चर्चेनुसार ओमकार सातपुते यांच्यासह कार्यकर्ते रात्री अकरा वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यात दाखल होण्यासाठी केडगाव ते कोतवाली पोलीस ठाण्यापर्यंत पायी आले. पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Tags :

