पाथर्डी तालुक्यात विविध ठिकाणी शिवजयंती साजरी
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यात विविध ठिकाणी फाल्गुन वद्य तृतीया या हिंदू तिथीप्रमाणे १० मार्च २०२३ रोजी शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करतांना शिवरायांच्या घोषणा देत शिवजयंती साजरी करण्यात आली.
देशभरात शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने मोठ्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. दरवर्षी शिवप्रेमी मोठ्या आतुरतेने आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीची वाट बघत असतात. मात्र शिवप्रेमी मध्ये वेगवेगळे गट आहेत. काही तारखेनुसार तर काहीजण तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात.
*पाथर्डी शहरात शिवरायांना अभिवादन-*
पाथर्डी शहरात पंचायत समिती येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवघोषणा देऊन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
अभिवादन करतांना सेनेचे जेष्ठ नेते नवनाथ चव्हाण, पंचायत समिती माजी सदस्य विष्णुपंत पवार, शिक्षक सेनेचे तालुकाप्रमुख नंदकुमार डाळिंबकर, तालुका उपप्रमुख नवनाथ उगलमुगले, नवनाथ वाघ, शहर संघटक संतोष मेगुंडे, सरपंच अविनाश पालवे, आजिनाथ चन्ने, आजिनाथ गीते, गणेश पालवे, संजय कराळे आदी उपस्थित होते.
माणिकदौंडी येथे शिवजयंती साजरी
शिवसेना माणिकदौंडी विभागाच्या वतीने शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी विष्णुपंत पवार, नवनाथ चव्हाण, सरपंच शायद पठाण, बबन शेळके, निलेश चेके, मधुकर धावड, चितळवाडीचे सरपंच संजय चितळे, शिवाजी मोहिते पाटील, गौतम पटवा, दिनकर पोमण, चेअरमन अजिज पठाण, नासिर बेग, गोरख चितळे आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.