पांढरी पुल येथे अपघात, कंटेनरची आठ वाहनांना धडक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील पांढरी पुल येथे 29 जुलै सायंकाळी रोजी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
अहमदनगर- संभाजी नगर महामार्गावर पांढरी पुल येथे अहमदनगरकडून संभाजी नगरकडे जाणाऱ्या कंटेनरने आठ वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
अहमदनगर-छ. संभाजीनगर महामार्गावर विचित्र अपघात; ट्रकने १० ते १२ चार चाकी आणि दुचाकी वाहनांना उडवलं
ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती मिळालीय. नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपुल येथे हा विचित्र अपघात झालाय.
सध्या जखमींना उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, या अपघातात 12 जण जखमी झाले आहे.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच सोनई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी दाखल केले तसेच या अपघातामुळे घाटाच्या दोन्ही बाजूंनी दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.