आमदार निलेश लंकेंच्या उपोषणाला पाठिंबा, पाथर्डीत कडकडीत बंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी (जि. अहमदनगर) : राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याने शेकडो लोकांचे बळी जात आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करीत निलेश लंके यांचे नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी पाथर्डीत कडकडीत बंद पाळण्यात आला.
व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली. रस्त्यावरील विक्रेत्यांनीही या बंदला पाठिंबा दिला.
पाथर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी या पक्षाचे कार्यकर्ते उपोषणाला सहभागी होण्यासाठी नगरकडे रावाना झाले आहेत. दरम्यान शेवगाव तालुक्यातील अनेक गावातही बंद पाळण्यात आला. नगर -मनमाड रोडवरील नगर तालुक्यातील अनेक गावे उपोषणात सहभागी होणार आहेत. दरम्यान या गावातही लोकांनी बंद पाडून प्रशासनाचा निषेध केला. नगर -मनमाड रोडवरील गावातील ग्रामस्थ महामार्गावर रास्ता रोको करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.