वऱ्हाड घेऊन जाणारी पिकअप विहिरीत कोसळली; आठ जखमी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील रवंदा येथून संभाजीनगर जिल्हातील खुलताबादकडे जात असलेली भरधाव पिकअपवरील चालकाचा वेगावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्याकडेला असलेल्या विहिरीत कोसळली.
ही घटना कोपरगाव तालुक्यातील तळेगावमळे हद्दीततील जुन्या मुंबई - नागपूर महामार्गावर गुरुवारी (दि. ४) घडली.
या घटनेत चालकासह गाडीतील आठ जण जखमी झाले आहे. तळेगावमळे परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावल्याने वेळेवर सगळ्यांना विहिरीबाहेर काढून उपचारार्थ वैजापूर व कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी ग्रामस्थ व क्रेनच्या सहायाने पिकअपसह वाहनातील लोकांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात अनिल पवार, आकाश पवार, कृष्णा पवार, रवी पवार, विकी पवार यांच्यासह इतर तीन जखमीवर उपचार सुरू आहे.