खरवंडी कासार येथे सकल मराठा समाजाने आ.मोनिका राजळे यांचा ताफा अडवला
पाथर्डी -प्रतिनिधी
पाथर्डी- शेवगाव मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांचा ताफा पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे आला असता सकल मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाजाच्या नागरिकांनी तो अडवला.यावेळी नागरिकांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत प्रश्न विचारत आमदार पदाचा राजीनामा देणार का? असा प्रश्न उपस्थित केला.यावेळी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत जाहीर निषेध व्यक्त केला.यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती.आमदार मोनिका राजळे यांच्या सोबत यावेळी भाजपचे माणिक खेडकर,बाळासाहेब गोल्हार,काशीबाई गोल्हार यांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.