महाराष्ट्र
82058
10
शेतकऱ्यांना ५ वर्षे मोफत वीज; ७.५ एचपीपर्यंत कृषीपंप वापरणाऱ्या
By Admin
शेतकऱ्यांना ५ वर्षे मोफत वीज; ७.५ एचपीपर्यंत कृषीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार फायदा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार जे शेतकरी ७.५ एचपी म्हणजे अश्वशक्तीपर्यंत कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. राज्यात असे कृषीपंप वापरणारे ४४ लाख ३ हजार शेतकरी असल्याचे जीआरमध्ये म्हटले आहे.
म्हणजेच या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. या शेतकऱ्यांना पुढच्या ५ वर्षांसाठी मोफत वीज मिळणार आहे. या मोफत वीज योजनेची अंमलबजावणी एप्रिल २०२४ पासून होणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना मागच्या तीन महिन्याचे बिल भरावे लागणार नाही.
सरकारने शासन आदेशात म्हटले आहे की, जे शेतकरी ७.५ एचपीपर्यंत कृषी पंप वापरतात त्यांना मोफत वीज मिळेल. म्हणजेच ७.५ एचपीपेक्षा कमी क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोफत वीज मिळणार आहे. केवळ ७.५ एचपी पंपासाठी हा निर्णय नाही. पण ७.५ एचपीपेक्षा जास्त क्षेमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बील भरावे लागेल. म्हणजेच काय ७.५ एचपीपेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या योनजेचा लाभ मिळणार नाही.
तसेच जीआरमध्ये असे म्हटले आहे की, राज्यात ७.५ एचपीपर्यंत कृषी पंप वापरणाऱ्या सर्व शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. म्हणजेच एका शेतकऱ्याला एकाच कृषी पंपासाठी मोफत वीज मिळेल, याचा उल्लेख केला नाही. म्हणजेच एकापेक्षा जास्त कृषी पंपासाठी मोफत वीज मिळेल.
आता ही मोफत वीज बील योजनेला पुढील ५ वर्षे म्हणजेच २०२४ ते २०२९ पर्यंत मंजुरी देण्यात आली. पण ३ वर्षांनंतर या योजनेचा आढावा घेऊन ही योजना सुरु ठेवायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असेही या जीआरमध्ये सरकारने स्पष्ट केले. तसेच ही योजना राबविण्याची जबाबदारी महावितरणची असेल.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसकल्पात ही योजना जाहीर केली होती. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी १४ हजार ७६० कोटी रुपयांचा खर्च शासनाला येणार आहे. पण या संपूर्ण रकमेचा भार आताच सरकार येणार नाही. कारण सरकार आधीच कृषीला सवलतीच्या दरात वीज देत होते. त्यासाठी सरकार जवळपास ७ हजार कोटी रुपये अनुदान देत होते. त्यात आता जवळपास एवढीच रक्कम सरकारला आणखी टाकावी लागेल, असेही सरकारने जीआरमध्ये म्हटले आहे.
Tags :

