कोरोनामुळे परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा
नगर सिटीझन live टिम-
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. एखाद्या विद्यार्थ्यांस परीक्षेच्या काळात कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन , कन्टेनमेंट झोन , संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन जुन महिन्यामध्ये करण्यात येईल . सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये अनेक काळ संभ्रम होता.
परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांमधून मोठ्या प्रमाणात याआधी केली जात होती. परंतु ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते.
तसेच दहावी आणि बारावी मधील विद्यार्थ्यांस अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यास प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी मध्ये कोरोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन, कन्टेमेंन्ट झोन, संचारबंदी अथवा कोरोना विषय परिस्थितीमुळे, प्रात्यक्षिक परीक्षा किंवा असाइनमेंट सादर करण्यास १५ दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल असं बोर्डाने आपल्या निवेदनात सांगितलं आहे.