कवडदरा विद्यालयाची विज्ञान प्रदर्शनासाठी राज्य पातळीवर निवड
नाशिक - प्रतिनिधी
नाशिक येथे झालेल्या 50 वे जिल्हा विज्ञान प्रदर्शनात भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज कवडदरा ता.इगतपुरी जि.नाशिक या विद्यालयाला घवघवीत असे यश मिळवले आहे.
माध्यमिक गटात व्दितीय क्रमांक मिळवला.
स्मार्ट इन्होलोप उपकरण बनवून
कु. स्वराली श्रीराम लोहार
कु. विद्या ज्ञानेश्वर जुंदरे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
यांना श्री. श्रीराम शंकर लोहार, श्री. प्रमोद एकनाथ परदेशी यांचे विशेष सहकार्य मिळाले.
उपकरणांना व्दितीय क्रमांक मिळाला व या उपकरणाची राज्य पातळीवर निवड झाली आहे. यानिमित्ताने सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे विद्यालयाचे प्राचार्य , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , भारत सर्व सेवा संघाचे सन्माननीय अध्यक्ष राजेंद्र नलगे साहेब व सन्माननीय सचिव प्रकाश जाधव साहेब इतर संस्था पदाधिकारी व सदस्य तसेच कवडदरा व कवडदरा परिसरातील सर्व ग्रामस्थ , मान्यवर यांच्याकडून अभिनंदन करत व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.