सरकारने कापसाला दहा हजार रुपये हमीभाव द्यावा. बाळासाहेब ढाकणे
पाथर्डी- प्रतिनिधी
महाराष्ट्रातील शेतकरी अति पर्जन्यवृष्टीमुळे संकटात सापडला होता. त्यातच थोडाफार कापसाचे पिक आले, तर कापसाचे भाव गडगडल्यामुळे शेतकऱ्यांचा कापुस घरात पडून आहे.
अगोदरच अतिवृष्टी व आता कापसाला भाव नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तरी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या कापसाला क्विंटल मागे १० हजार भाव जाहीर करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय शेतकरी युनियनचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा किसान मोर्चा अहमदनगर दक्षिणचे सरचिटणीस शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली.
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडून कमी भाव देऊन लुट होत आहे. तरी शेतकरी बांधवाची लुट थांबवून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचा कापुस १० हजार रुपये किंटलप्रमाणे खरेदी करुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.