नगर दक्षिणमधून विखे-लंके लढत समतुल्य ; 55.25% जिल्ह्यात एकूण मतदान
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीतल्या सात टप्प्यांपैकी चौथ्या टप्प्यातलं मतदान आज (दि. १३) पार पडलं. साधारणपणे नगर दक्षिणेत सरासरी 55.25% पर्यंत मतदान झालं. तर उत्तर अर्थात शिर्डी मतदारसंघात तीच परिस्थिती राहिली. दक्षिण मतदार संघात भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी चांगलंच आव्हान दिलंय. या मतदारसंघात विखे आणि लंके यांच्यात चांगलीच चुरस झाल्याचं पाहायला मिळालं. या मतदारसंघात खासदार विखे-लंके यांचे समतुल्य असल्याचं जाणवतंय.
आज झालेल्या निवडणुकीत राज्यातल्या नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर आणि शिर्डी या 11 मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडली.देशातली इंडिया विकासासाठी आणि महाराष्ट्रातली महाविकास आघाडी ही भाजपचा पराभव करून जास्तीत जास्त जागा जिंकून घेते का, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
आज झालेल्या मतदान प्रक्रियेत छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेना शिंदे गटाचे संदिपान भुमरे यांच्यात लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांचं पारड जड असल्याचे दिसत आहे.