प्रकाश आंबेडकर यांच्यावरील बेताल टिप्पणीनंतर
शेवगाव मध्ये वंचित बहुजन आघाडीने केंद्रीय मंत्री नारायण राणेचा पुतळा जाळला
शेवगाव (प्रतिनिधी) शुक्रवार दि १-१२-२०२३ रोजी सकाळी ११ वाजता महापुरुषांच्या घोषणा देत मिरवणुक काढुन केंद्रीय मंत्री नारायण यांचा जाहीर निषेध करत राणे विरोधात घोषणा देवून प्रतिमेला चपलांचा हार टाकुन क्रांती चौकात नारायण राणेची प्रतिमा दहण करण्यात आली
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या आपत्ती जनक बेताल टिपणीनंतर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा राज्य प्रवक्ते प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुका यांच्यावतीने शेवगाव शहरातील क्रांती चौकामध्ये सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेस चपलांचा हार चढवून घोषणाबाजी करत त्याची मिरवणूक काढून नंतर शेवगाव च्या क्रांती चौकामध्ये येऊन त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी कोंबडी चोर म्हणूनही नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी ही करण्यात आली. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, अरुण झांबरे पाटील, रविन्द्र निळ, नगरसेवक कैलास तिजोरे, गणेश भिसे,शेख शफीकभाई, विष्णु वीर,अस्लम पठाण, गोरख तुपविहीरे, रज्जाक सैय्यद, सागर गरुड, गुलाब पटेल,बाळू गरुड, दादासाहेब गाडेकर,भिमा गायकवाड,आशोक गायकवाड, हाजी मोहम्मद हनीफ तांबोळी, विष्णु गायकवाड, गोरख वाघमारे,सोनू हुसैन व ईतर सामाजिक कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राज्य उपाध्यक्ष प्रवक्ते प्रा किसन चव्हाण यांनी नारायण राणे बाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली