प्राध्यापक दिलीप चौधर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील दादा पाटील राजळे कनिष्ठ महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे विषय शिक्षक प्रा. दिलीप दगडू चौधर यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. (वय ५३ वर्ष) त्यांचा अंत्यविधी अमरापूर येथे दि. २६/१२/२०२३ रोजी चौधर वस्ती, अमरापूर येथे पार पडला. समजीक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे विशेष योगदान होते. त्यांनी एकूण २७ वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्यांचा नेहमी पुढाकार व सहभाग असे. अतिशय मितभाषी व मनमिळवून स्वभाव असलेला एक सहकारी आम्ही गमावला आहे असे मत प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्याना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अमरापूर येथील प्रगतशील शेतकरी म्हणूनही त्यांची ओळख होती . त्यांचे पश्चात आई , वडील , बहिण , पत्नी , दोन मुले असा परिवार आहे .