ग्रामसेवकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सचिव पातळीवर सकारात्मक चर्चा
नगर सिटीझन live team-
ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव राजेश कुमार यांनी मुंबईत बैठक घेवून विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वा सन दिले.या चर्चेवेळी उपसचिव वित्त विभाग जाधवर, अवर सचिव कराड,मनरेगाचे उपसचिव,कक्ष अधिकारी,ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे,सरचिटणीस प्रशांत जामोदे,संजीव निकम,सुचित घरत, कल्पेश अधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये पंचायत विकास अधिकारी पदनिर्मिती,प्रवास भत्ता वाढ,पदवीधर ग्रामसेवक भरती,वैद्यकीय कॅशलेस सुविधा,अतिरिक्त कामकाज कमी करणे,ग्रामपंचायत पंधराव्या वित्त आयोगा च्या निधी खर्च बाबत येणार्या अडचणी दूर करणे,मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम ४९ बाबत आणि जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच आदर्श ग्रामसेवकांना आगाऊ वेतन वाढी देणे आदी महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
सर्व प्रलंबित प्रश्न तसेच मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलण्याची ग्वाही या बैठकीत देण्यात आली,अशी माहिती एकनाथ ढाकणे यांनी दिली.