महाराष्ट्र
65955
10
पोलीस 'ॲक्शन मोड'वर, अठरा हजार गुन्हेगारांवर कारवाई;
By Admin
पोलीस 'ॲक्शन मोड'वर, अठरा हजार गुन्हेगारांवर कारवाई; ८७० आरोपींची तडीपारी प्रस्तावित
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
लोकसभेसाठी अहमदनगर व शिर्डी मतदार संघासाठी चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. १३ मे रोजी मतदान पार पडणार असल्याने प्रशासन 'ॲक्शन मोड'वर आले आहे.जिल्ह्यातील १७ हजार ९२९ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे. स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस ठाणे स्तरावर कारवाईस सुरुवात झाली आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर नगर पोलिस ॲक्शन मोडवर आहेत. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे. तडीपारी, नोटीस बजावणे, एमपीडीए अशा कारवाया केल्या जाणार आहेत. आगामी काळात 'रुट मार्च' व 'कोम्बिंग ऑपरेशन' राबविले जाणार आहे.यापूर्वी निवडणुकीच्या काळात ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल आहेत, त्यांच्या आताच्या हालचालींवर पोलिस प्रशासन लक्ष ठेवून आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईचा 'ॲक्शन प्लॅन' तयार करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस ठाणे स्तरावरील यंत्रणा या कामात लागली आहे. शस्त्र परवाना आहे, त्यांना निवडणुकांआधी शस्त्र जमा करण्यासाठीची प्रक्रिया पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे.
तीन हजार जणांवर कारवाई
आतापर्यंत तीन हजार ५३ आरोपींवर कारवाई करण्यात आली. वॉरंट बजावणे, प्रतिज्ञापत्र लिहून घेणे, तडीपारी, एमपीडीए अशा कारवाया केल्या जात आहेत.
अवैध शस्त्रांसाठी 'स्पेशल ड्राइव्ह'
गावठी पिस्तूल, चाकू, सुरे, तलवारी व इतर हत्यारांची अवैधरित्या तस्करी करणाऱ्यांची नाकाबंदी करण्यासाठी पोलिस प्रशासन 'स्पेशल ड्राइव्ह' राबविणार आहे.
विभागनिहाय प्रस्तावित कारवाया
संगमनेर- ३९९६
नगर- १९७८
नगर ग्रामीण २५८६
कर्जत २४९१
श्रीरामपुर- ३१४४
शेवगाव- १६५६
शिर्डी- २१५०
Tags :

