महाराष्ट्र
79193
10
प्रस्थापित कारखानदारांना विधानसभा निवडणुकीत जनता त्यांची
By Admin
प्रस्थापित कारखानदारांना विधानसभा निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवणार -प्रा. किसन चव्हाण
मोहोजदेवढे येथे वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन
पाथर्डी प्रतिनिधी:
तालुक्यातील मोहोजदेवढे येथे वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन व प्रा. किसन चव्हाण यांची घोंगडी बैठक नुकतीच मारुती मंदिराच्या सभामंडपात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण म्हणाले की, शेवगाव पाथर्डी तालुक्यातील किमान १५० घोंगडी बैठका झाल्या, या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून मोठी जनशक्ती वंचित बहुजन आघाडीमध्ये तयार झाली तसेच बहुतेक शेतकरी, गोरगरीब कुटुंबांना,घरकुल,डोल,कुपण,शिवरस्ते, पाणंद रस्ते, वीजपुरवठा संदर्भात अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.
विधानसभा निवडणुका जवळ आल्याने घरात बसलेले आणि जनतेला वाऱ्यावर सोडून दिलेले मतदारसंघातील कारखानदार घराबाहेर पडले आहेत. निवडणुका आल्यावरच या प्रस्थापित कारखानदारांना जनतेची आठवण येते. या कारखादारांना या निवडणुकीत जनतेने जागा दाखवण्याचे ठरवलेले आहे. पुढील काळात सर्व समाज बांधवांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी कायमस्वरूपी लढा देत राहू. सर्वसामान्यच्या गोरगरीबाच्या न्याय हक्काच्या या संघर्षमय स्वाभिमानी लढाईला आपण साथ द्या, असे आवाहनही प्रा. चव्हाण यांनी बोलतांना केले.
या प्रसंगी विद्यमान सरपंच रावसाहेब देवढेपाटील, विष्णू खंडागळे,आजिनाथ देवढेपाटील, शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, लक्ष्मण मोरे,संजय सिरसाट,सिध्दु गर्जे, अरविंद साळवे,तुकाराम काटे, पंढरीनाथ सोनवणे,बंडा देवढे,केजी उबाळे,विजू दादा खंडागळे, आनंद उबाळे, देवीदास भारस्कर ,बाळू उबाळे, विकास उबाळे, रणजित थोरात, संतोष सिरसाट, पाथर्डी शहराध्यक्ष राजु पठाण, राजू पवार, संजय पगारे शिवाजी सिरसाट,राजु सिरसाट, शंकर सिरसाट,रामा सोनवणे, इतर सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा कार्यकर्ते गोरक्ष देवढे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार शंकर सिरसाट यांनी मानले.
Tags :

