महाराष्ट्र
मेंढपाळाच्या कळपावर बिबट्याचा हल्ला
By Admin
मेंढपाळाच्या कळपावर बिबट्याचा हल्ला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील बहिरोबावाडी येथे लिंगमाळवस्ती परिसरात ढवळपुरी येथील मेंढपाळ बबन तांबे भीमराव देठे यांच्या कांद्याच्या शेतात मेंढ्या चारत असताना सोमवारी सायंकाळी सहा वाजता अचानक बिबट्याने बोकडावर झडप घातली.
यामुळे कळपातील मेंढ्या घाबरून सैरावैरा पळू लागल्या. बोकडाला बिबट्या घेऊन जाताना मेंढपाळ बबन तांबे यांनी पाहिले. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने काही अंतरावर बोकडाला सोडून धूम ठोकली.
परंतु, या हल्ल्यात बोकडाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मेंढपाळाने शेतकरी नेते अनिल देठे यांना दिली. देठे यांनी तत्काळ वनविभागाच्या अधिकार्यांना याबाबत माहिती देत घटनेचा पंचनामा करून मेंढपाळाला नियमानुसार नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली. वनविभागारतर्फे वनपाल नीलेश बडे यांनी मंगळवारी सकाळी तातडीने बहिरोबावाडी येथील घटनास्थळी येत झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. लवकरात लवकर संबंधित मेंढपाळाच्या बँक खात्यावर शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत वर्ग होईल, असे सांगितले.
वन विभागाच्या अधिकार्यांचा हलगर्जीपणा
तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढलेला असून, त्याकडे वनविभाग दुर्लक्ष करत आहे.अनेक शेतकरी रात्री अपरात्री शेतात पाणी देण्यासाठी जातात. त्यांना नेहमी बिबट्याचे भय सतावते. वन विभागाकडे पिंजरे लावण्या संदर्भात मागणी करूनही अनेक भागांमध्ये विभागाच्या अधिकार्यांचा हलगरजीपणा होत आहे. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
वर्षभरापासून किन्ही, बहिरोबावाडी परिसरात दोन ते तीन बिबट्यांचा वावर असून, आतापर्यंत अनेक मेंढपाळांच्या शेळ्या, मेंढ्या व घोड्यांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. यासंदर्भात वनविभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार करून पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. परंतु, वनविभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.
Tags :
331829
10