प्रवरा माध्यमिक विद्यालयात पद्मभूषण डॉ. विखे पाटील यांची पुण्यतिथी साजरी
पाथर्डी प्रतिनिधी:
तालुक्यातील भूतेटाकळी येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयात दि. ३० डिसेंबर रोजी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांची नववी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून श्री. दत्तात्रय वारकड हे होते. यावेळी शाळा समिती अध्यक्ष कुमारभाऊ फुंदे, सदस्य भाऊसाहेब फुंदे, बाबासाहेब फुंदे, नारायण फुंदे, म्हातारदेव फुंदे, संभाजी फुंदे, दादासाहेब फुंदे, सोमनाथ गिरी, गोरक्ष गिरी उपस्थित होते.
या प्रसंगी व्याख्याते वारकड यांनी पद्मभूषण यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला आणि मूल्यशिक्षण आणि आनंदी जीवन या वर सुंदर व्याख्यान दिले. वैष्णवी फुंदे, भाग्यश्री फुंदे, सुवर्णा केदार, आदिती फुंदे या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट भाषणे केली.
मुख्याध्यापक पठाण आसिफ यांनी यथोचित पाहुण्यांचा सत्कार केला आणि पद्मभूषण यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे, असे मनोगत व्यक्त केले.
प्रास्तविक बाळासाहेब फुंदे तर आभार बंडोपंत गोडगे यांनी मानले. विद्यार्थ्यांना अल्पपोहार देण्यात आला.
यावेळी टाकळकर अजिनाथ, अशोक भगत, खुडे लक्ष्मण, सांबारे धनंजय, खेडकर अशोक, फुंदे वाल्मिक आदी उपस्थित होते.