महाराष्ट्र
9707
10
पाथर्डीत मकरसंक्रांतीनिमित्त भव्य हळदी-कुंकवाचा कार्यक्रम
By Admin
पाथर्डीत मकरसंक्रांतीनिमित्त भव्य हळदी-कुंकवाचा कार्यक्रम
पाथर्डी प्रतिनिधी:
चैतन्य फाऊंडेशन यांच्या वतीने प्रगती व्यासपीठ हॉल येथे मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकवाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांचा सन्मान, सामाजिक बांधिलकी आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम विशेष ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथर्डी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा सौ.. मंगलताई कोकाटे या होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका सौ. शारदाताई गर्जे, नगरसेविका सौ. वर्षाताई मोरे तसेच महिला बचत गटांच्या सहयोगिनी श्रीमती भारतीताई असलकर उपस्थित होत्या.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना सौ. मंगलताई कोकाटे यांनी चैतन्य ग्रुप सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असून, विविध व्यवसायांच्या माध्यमातून प्रामाणिक व पारदर्शक कार्यपद्धतीमुळे नावारूपाला आला असल्याचे गौरवोद्गार काढले.
डॉ. शारदाताई गर्जे यांनी आपल्या भाषणात महिलांची क्षमता अधोरेखित करत, “आजचा कार्यक्रम हा केवळ हळदी-कुंकवा पुरता मर्यादित नसून स्त्रीच्या सन्मानाचा उत्सव आहे. समाजाची गरज ओळखून कार्य करणारे चैतन्य ग्रुपचे अध्यक्ष श्री अनंत ढोले यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उभारलेला चैतन्य ग्रुप अभिमानास्पद आहे,” असे नमूद केले.
श्रीमती भारतीताई असलकर यांनी चैतन्य परिवाराने तळागाळातील घटकांना सातत्याने मदत केल्याचे सांगून, महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात श्री. अनंत ढोले यांचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमात चैतन्य फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. मंगल ढोले यांनी उपस्थित सर्व महिलांचे स्वागत करून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या व हळदी-कुंकवाच्या निमित्ताने सर्व महिलांचा सन्मान केला.
या कार्यक्रमास सौ. अनुजा कुलकर्णी, विवेकानंद विद्यालय पाथर्डीचे मुख्याध्यापक व महिला शिक्षिका सौ. मोहिनीताई गोसावी, सौ. रेश्मा राठोड, सौ. मीना ढोले, सौ. वर्षाताई वाघ, सौ. मीराताई वाघ, सौ. ज्योतीताई आंधळे, श्रीमती अनिता काटकर, सौ. सारिका मराठे आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चैतन्य ग्रुपचे सरव्यवस्थापक श्री बापू पायघन यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. वर्षा वाघ यांनी केले.
महिला सन्मान व सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम सर्वांच्या प्रशंसेस पात्र ठरला.
Tags :
9707
10




