महाराष्ट्र
70301
10
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित बाबींची तातडीने अंमलबजावणी करावी-
By Admin
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित बाबींची तातडीने अंमलबजावणी करावी- रामनाथ कराड
श्री विवेकानंद माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापकांची कार्यशाळा
पाथर्डी प्रतिनिधी:
शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणा बरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्वपूर्ण असून अलीकडच्या काळात विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, या बाबींची शासनस्तरावर गंभीर दखल घेण्यात आली असून अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, अशोक कडुस यांनी जिल्ह्यातील सर्व क्षत्रिय अधिकारी यांची बैठक घेऊन विद्यार्थ्याच्या सुरक्षितता व उपाय योजना शाळा स्तरावर करण्याच्यदृष्टीने सूचना दिल्या आहेत, त्या अनुषंगाने पाथर्डी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक (जिल्हा परिषद, खाजगी) यांची कार्यशाळा श्री विवेकानंद माध्यमिक विद्यालय पाथर्डी येथे आयोजित केली होती. त्या प्रसंगी सर्व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करताना श्री रामनाथ कराड हे बोलत होते.
श्री कराड मार्गदर्शन करतांना म्हणाले,एक महिन्यात तालुक्यांतील सर्व शाळेत सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, असे मुख्याध्यापकांना आवाहन केले. शालेय शिक्षण व क्रीडा विभागचे दि. २१ऑगस्ट २०२४ चे शासन परिपत्रक नुसार सर्व शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, सीसीटीव्ही कॅमेराचे आठवड्यातून तीन वेळा फुटेज तपासणे, प्रत्येक शाळेत तक्रार पेटी दर्शनी भागात लावणे, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सर्व समिती सदस्य समोर नोंद घेऊन फोडणे, आलेल्या तक्रारीचे अनुषंगाने उपाय योजना करणे, गंभीर घटना घडल्या असतील तर स्थानिक पोलिस प्रशासन संपर्क साधून योग्य कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील, सर्व शाळेत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग चे दि. १० मार्च २०२२ चे परिपत्रक नुसार सखी सावित्री समिती स्थापना करावी, पाच सप्टेंबर पुर्वी सखी सावित्री समिती सदस्यांची बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता बाबत ठोस उपाय योजना करणे बाबत इतिवृत्त तयार करून मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येतील, अशी माहिती माहिती दिली. विदयार्थी सुरक्षितता व ठोस उपाय योजना संदर्भात येत्या एक संप्टेबर ते दहा सप्टेंबर अखेर चाईल्ड सेफ्टी ऑडिट केले जाईल, असे श्री कराड यांनी शेवटी मार्गदर्शन करतांना सांगीतले.
मुख्याध्यापक कार्यशाळेचे प्रास्ताविक समनव्यक श्री माऊली गायखे यांनी केले तर सुत्रसंचालन श्री राजेंद्र जायभये यांनी केले.आभार श्री दिलीप बोरुडे यांनी मानले.
मुख्याध्यापक सहविचार सभेसाठी केंद्र प्रमुख श्री उध्दव बडे,प्राचार्य संजय घीगे, कल्पजीत डोईफोडे, श्री बालम शेख, श्री गाहिनाथ शिरसाट, श्रीम नंदा तुपे, कांबळे रावसाहेब,बाळासाहेब गोल्हार,बाळासाहेब खेडकर, श्रीमती ज्योती अधाट, रामदास दहिफळे, सुनिल खेडकर, देविदास बडे, राजेंद्र गोल्हार, बाळकृष्ण माने, बाळासाहेब कुलट, राजाराम माळी सह ११५ प्राथमिक, माध्यमिक मुख्याध्यापक उपस्थित होते.
Tags :
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/like.png)
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/chat.png)