महाराष्ट्र
180660
10
शासनाचे वृक्ष संवर्धन संदर्भात विविध प्रकारचे उपक्रम
By Admin
शासनाचे वृक्ष संवर्धन संदर्भात विविध प्रकारचे उपक्रम - सुरेश निगळे
खडकेद आश्रमशाळेत वृक्षारोपण
कवडदरा- प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखराच्या च्या पायथ्याशी असलेल्या खडकेद या ठिकाणी असलेल्या आदिवासी विद्या प्रसारक समाज घोटी बु.ता. इगतपुरी जि. नाशिक शैक्षणिक संस्थेच्या प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रम शाळेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार गट) यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी (अजित पवार गट) नाशिक जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, इगतपुरी ता. मा. आमदार शिवराम झोले, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा.जि.प.सदस्य गोरख बोडके, मा. जि. प. सदस्य बाळासाहेब गाढवे, इगतपुरी तालुका अध्यक्ष पांडुरंग वारंघुशे,टाकेद गट प्रमुख संतोष भोसले,सोशल मीडिया प्रमुख किरण मुसळे, सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे, सामाजिक,कार्यकर्ते दूंदा जोशी,मुख्याध्यापक सुरेश निगळे,संतु भालेराव, तुषार देवरे,योगेश नाठे, संजय काळे,भरत वाघ,पंढरीनाथ धोंगडे,ईश्वर बच्छाव,विठ्ठल खतेले,महेंद्र बच्छाव, राजेश मोहिते,भाऊराव रोंगटे,भाऊसाहेब खाडे, अधिक्षिका शुभांगी पाटील,प्रवीण धादवड, जाधव, रोंगटे, जाधव,खाडे, शिक्षक वृंदा सह गोरख जाधव, उल्हास वाघ,शाम गवारी नाडेकर, वर्षा नाथ, नंदा अकोटकर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी शाळेच्या नुतन चाललेल्या तसेच सध्याच्या इमारतीच्या आवारात सर्वच मान्यवरांच्या हस्ते विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.मान्यवरांचा शालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक भाऊराव रोंगटे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सुरेश निगळे यांनी मानले..
------------------------------------------------------------------------फोटो...
नुतन इमारत येथे वृक्षारोपण करताना(अजित पवार गट) नाशिक जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, इगतपुरी ता. मा. आमदार शिवराम झोले, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा.जि.प.सदस्य गोरख बोडके, मा. जि. प. सदस्य बाळासाहेब गाढवे, इगतपुरी तालुका अध्यक्ष पांडुरंग वारंघुशे इ.मान्यवर..
प्रतिक्रिया
आज शासनाचे मोठ्या प्रमाणात वृक्ष संवर्धन संदर्भात विविध प्रकारचे उपक्रम चालू आहेत. मागच्याच काही दिवसापूर्वी पासून एक पेड माँ के नाम उपक्रम चालू असतानाच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यातील सर्व पदाधीकाऱ्यांनी आमच्या खडकेद आश्रम शाळेत वृक्षारोपण केले. खूप आनंद झाला मनापासून सर्वांचे आभार..
-सुरेश निगळे (प्राथ. मुख्याध्यापक खडकेद)
छायाचित्रात-
खडकेद येथील शाळेत वृक्षारोपण करतांना याप्रसंगी (अजित पवार गट) नाशिक जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, इगतपुरी ता. मा. आमदार शिवराम झोले, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा.जि.प.सदस्य गोरख बोडके, मा. जि. प. सदस्य बाळासाहेब गाढवे, इगतपुरी तालुका अध्यक्ष पांडुरंग वारंघुशे, मुख्याध्यापक सुरेश निगळे सह सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी.
Tags :
180660
10





