कोविड सेंटरची हलवाहलवी, तीनदा स्थलांतर
By Admin
पाथर्डी- कोविड सेंटरची हलवाहलवी, तीनदा स्थलांतर
नगर सिटीझन live टिम-
पाथर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकिय वसतीगृहात सुरु केलेल्या कोवीड तपासणी केंद्रात अत्यंत घाण झाली आहे. अशा अवस्थेत येथे कर्मचारी रुग्णांची तपासणी करतात. कोवीड तपासणी केंद्रच अस्वच्छतेच्या गर्तेत सापडल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
पाथर्डी शहरातील कोविड तपासणी केंद्र आठ दिवसात तीन वेगवेगळ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे.
तपासणीसाठी नेमके कुठे जायचे यासाठी नागरीक वनवन फिरताना दिसत आहेत. उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड तपासणी केंद्र, पहील्यांदा काकडे वस्तीगृह येथे हलविले. दोन दिवसानंतर हे सेंटर डॉ. बाबासाहेब आबेंडकर शासकिय वस्तीगृह (गायछाप कारखान्यासमोर) येथे स्थलांतरीत करण्यात आले होते.
पाथर्डीत कोवीड तपासणी केंद्राची अवस्था अतिशय गंभीर बनली आहे. तपासणी केंद्रात काम करणारे दोन कर्मचारीच बाधीत निघाले आहेत. आंबेडकर वसतीगृहातील केंद्रामध्ये पहील्या दिवशी कर्मचाऱ्यांनी वापरलेली पीपीईकीट झाडावर फेकुन दिलेली होती. तर कचरा तपासणी करण्याच्या ठिकाणीच पडलेला होता.
पडलेल्या कचऱ्यावर दुसऱ्या दिवशीची तपासणी केली गेली. कोवीड तपासणी केंद्र उपजिल्हा रुग्णालयातील मागच्या बाजुला होते. तेथुन ते काकडेवसतीगृह येथे हलवले. तीन दिवसानंतर तेथुन ते डॉ. बाबासाहेब शासकिय वसतीगृहात स्थलातंरीत करण्यात आले.
आठ दिवसात तीन ठिकाणी तपासणी केंद्र बदलल्याने रुग्णांची पळापळ झाली. नागरीकांनी तापसणीसाठी नेमके कोठे जायचे असा प्रश्न आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अनेक अडचणी येत आहेत. कोवीडच्या परिस्थितीत नवीन वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, तंत्रज्ञ, वॉर्डबॉय अशा सव्वीस जागा तात्पुरत्या स्वरुपात भरण्याचा निर्णय स्थानिक प्रशसानाने घेतला आहे.
कोवीड सेंटरमध्ये स्वच्छता केली जाईल. अपुरे मनुष्यबळ असल्याने व काम करणारे कर्मचारीच कोरोना बाधीत होत असल्याने अचडणी येतात. कोवीडच्या परिस्थितीत जनतेनेही सांभाळून घेण्याची गरज आहे. लोकभावना ओळखुण आम्ही काम करतो. जनेतेनेही सहकार्य करावे
- डॉ. भगवान दराडे, तालुका आरोग्यअधिकारी पंचायत समिती पाथर्डी.