प्रा.डाॕ. बाळासाहेब माने प्रतिष्ठान च्या वतीने मोफत पाणीपुरवठा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - शनिवार 01 मे 2020
पाथर्डी तालुक्यातील शेवगाव नगर रोडलगत ढवळेवाडी फाटा येथे कृषी विभागामार्फत बांधलेल्या हौदामध्ये मागील एक महिन्यापासून ग्रामपंचायतीचे पाणी काही कारणास्तव सोडण्यात आलेले नाही.सदर हौदावर रानात चरण्यासाठी जाणारी जनावरे, वृद्धेश्वर साखर कारखान्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांचे बैल तसेच आजूबाजूला असलेले दारकुंडे वस्ती, बहिर वस्ती, थिटे वस्ती येथील रहिवासी पाण्यासाठी अवलंबून आहेत. परंतु अनेक दिवसांपासून पाणी न आल्यामुळे सदर सर्वांनाच खूप त्रास सहन करावा लागत होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदैव समाजकार्यात तत्पर असणाऱ्या प्रा. डॉ. बाळासाहेब माने प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा. श्री. संदिप माने सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी टँकर द्वारे पाणी आणून हौदात सोडून भर कडक उन्हात मुक्या जनावरांसाठी व वस्तीवरील लोकांसाठी मोफत पाण्याची व्यवस्था केली आहे.
सदर कामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप माने सर, जालिंदर दारकुंडे, आदिनाथ वाळके, दादासाहेब थिटे, अनिरुद्ध थिटे, लक्ष्मण माने, गोरक्ष दुसंग, ऋषिकेश दुसंग, राहुल दुसंग, बाळासाहेब चितळे, देविदास लवांडे,नारायण माने यांनी सहकार्य केले.