दादापाटील राजळे महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती साजरी
आदिनाथनगर-(पाथर्डी तालुका)
पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादापाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालय आदिनाथनगर या ठिकाणी १ ऑगस्ट २०२४ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती मराठी विभाग व वांड्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजधर टेमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी झाली.प्राचार्य डॉ.राजधर टेमकर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्याचा व विविध चळवळीबद्दलचा मागोवा घेतला.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे कामगार चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व होते. समाजातील दलित,शोषित आणि उपेक्षित घटकांना न्याय देण्याचे काम त्यांनी त्यांच्या साहित्यातून केले.याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ.जे.टी कानडे यांनी देखील अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वांड्मय मंडळ विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.बी.देशमुख यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.सी.पी काळे यांनी केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजधर टेमकर,नॅक समन्वयक डॉ.राजू घोलप,कला विभागप्रमुख डॉ.एम.एस. तांबोळी, विज्ञान शाखा प्रमुख डॉ.जे.एन.नेहूल, वाणिज्य शाखा प्रमुख डॉ.एस.जे.देशमुख, संगणक विभाग प्रमुख प्रा.सी.एन.पानसरे, कार्यालयीन अधिक्षक श्री.विक्रमराव राजळे सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षेकेत्तर कर्मचारी,सर्व विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.