दादापाटील राजळे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
आदिनाथनगर - प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादापाटील राजळे महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून राजळे महाविद्यालयात अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री. आनंद कॉलेज येथील प्राणिशास्त्र विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. बी. आर. घोरपडे यांनी आपल्या मनोगतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर दृष्टिक्षेप टाकत त्यांचे आचार-विचार आणि चरित्र संपूर्ण समाजाला प्रेरणादायी, बोध घेण्यासारखे असून तसे आचरण करणे हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ठरेल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर होते. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे नेते होते. त्यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून समाजात समता, बंधुता व न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी प्रयत्न केले. आधुनिक भारताच्या जडणघडणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य महान असल्याचे मत उपस्थितांसमोर मांडले. त्यांचे विचार, कार्य व लोकशाही तत्वाची जोपासना केली तर सदृढ समाज निर्मिती होऊ शकेल अशी सदभावना व्यक्त केली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे आय. क्यु. ए. सी. समन्वयक डॉ. राजू घोलप, कला शाखाप्रमुख डॉ. महिबूब तांबोळी, विज्ञान शाखाप्रमुख डॉ. जनार्दन नेहूल, डॉ. गंगाधर लवांडे, डॉ.जालिंदर कानडे, डॉ. सुभाष देशमुख, डॉ. राजकुमार घुले, डॉ. आसाराम देसाई, डॉ. अतुलकुमार चौरपगार, डॉ. निर्मला काकडे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. किशोर गायकवाड यांनी केले.