कवडदरा विद्यालयात डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ शाळा प्रवेश दिन, विद्यार्थी दिवस साजरा
कवडदरा- भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा (ता.इगतपुरी) विद्यालयात न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयात डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ
शाळा प्रवेश दिन, विद्यार्थी दिन ७ नोव्हेंबर साजरा करण्यात आला.यावेळी महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन ज्येष्ठ शिक्षक श्री.आर.एल.राठोड सर, डी.व्ही.चव्हाण,पञकार अमोल म्हस्के, एस.डी.जाधव,गजघाट सर,व्हि.आर.भांगे सौ.एस.के.भोईर,सौ.के.ए.मुल्ला तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यालयात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी निबंध स्पर्धेत एकूण २४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.तसेच काव्यवाचन स्पर्धेत कु.अस्मिता संजय म्हसळे वक्तृत्व स्पर्धेत कु. स्नेहा ज्ञानेश्वरी लोहरे, कु.ईश्वरी सोमनाथ फोकणे,कु.अनन्या दत्तू कोकणे,कु.श्रावणी सुनिल देशमुख,तेजस समाधान बिन्नोर,नितेश लहानु निसरड, साहिल शांताराम म्हसळे यांनी सहभाग घेतला. अतिशय चांगल्या प्रकारे कलागुण विद्यार्थ्यांनी सादर केले.