महाराष्ट्र
21182
10
शनैश्वर देवस्थानचा कारभार पुन्हा विश्वस्तांकडे
By Admin
शनैश्वर देवस्थानचा कारभार पुन्हा विश्वस्तांकडे
खंडपीठाने दिला महत्त्वपूर्ण निकाल
नगर सिटीझन न्यूज नेटवर्क-
श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर
येथील शनैश्वर देवस्थानचा कारभार विश्वस्त मंडळ की कार्यकारी समितीने पहायचा, या प्रकारणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात सुनावणी सुरू होती. त्या प्रकरणाचा महत्वपूर्ण निर्णय
काल शुक्रवारी (दि. १२) रोजी खंडपीठाने देत विश्वस्त मंडळाकडे देवस्थानचा कारभार देण्याचा निकाल दिला आहे. विश्वस्तांची मुदत डिसेंबर अखेर संपत असल्याने पुढील महिन्यात नवीन कारभारी येणार आहे.
विधीमंडळात भाजपचे आ. सुरेश धस व शिवसेना शिंदे गटाचे आ. विठ्ठलराव लंघे यांनी शनैश्वर देवस्थानमध्ये नोकर भरतीप्रश्नी आवाज उठवला होता. महाराष्ट्र सरकारने देवस्थानमध्ये झालेली अवैध नोकर भरती व येथे गैरप्रकार झाल्याप्रकरणी विश्वस्त मंडळ
बरखास्त करून तेथील व्यवस्था पाहण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची प्रशासक म्हणून २२ सप्टेंबर रोजी नियुक्ती केली. प्रशासक डॉ. आशिया यांनी सुत्रे हाती घेऊन प्रशासकीय कार्यालयातील दप्तरे सील केली व येथील दैनंदिन व्यवस्था पाहाण्याकरीता ११ जणांच्या कार्यकारी समितीची स्थापना केली. समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांची नियुक्ती प्रशासक डॉ. आशिया यांनी केली. विश्वस्त मंडळाने या
छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाचे
आम्ही स्वागत करतो. आजच्या निर्णयाने विश्वस्त मंडळाच्या कामकाजावर शिक्कामोर्तब झाले आहे. विश्वस्त मंडळाने नियमाप्रमाणे आजपर्यंत कारभार केलेला आहे आणि पुढेही करण्यात येईल. न्यायालयाने सरकार नियुक्त प्रशासकाची नियुक्ती नाकारलेली आहे आणि पुन्हा विश्वस्त मंडळाला कामकाज करण्याचा आदेश दिलेला आहे. आजच्या निर्णयाने स्थानिक विरोधकांना मोठी चपराक बसली असून त्यांनी विनाकारणच बिनबुडाचे आरोप विश्वस्त मंडळावर केले होते ते सर्व आरोप चुकीचे होते ते आज सिद्ध झाले आहे.
- आप्पासाहेब शेटे, विश्वस्त, शनैश्वर देवस्थान ट्रस्ट, शिंगणापूर
निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करत प्रशासक व कार्यकारी समितीच्या निवडीलाच आव्हान दिले होते. न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी पूर्ण होईपर्यंत 'जैसे थे' परिस्थिती
ठेवण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर १२ डिसेंबर रोजी न्यायालयाने विश्वस्तांच्या बाजूने निकाल दिला आहे. विश्वस्त मंडळाच्या वतीने अॅड. सतीश तळेकर यांनी बाजू मांडली.
Tags :
21182
10




