चवदार तळे सत्याग्रह निमित्त डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
पाणी पिऊन बौद्ध बांधवांची महामानवास मानवंदना
पाथर्डी प्रतिनिधी:
तालुक्यातील निवडुंगे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी महाड चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या निमित्ताने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर पाणी पिऊन बौद्ध बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली. यावेळी निवडुंगे गावातील माता रमाई महिला मंडळ यांच्या पुढाकाराने सर्व महिलांनी एकत्रित येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून त्रिसरण पंचशील ग्रहण करून व त्यांच्या प्रतिमा समोर पाणी पिऊन मानवंदना देण्यात आली.
या कार्यक्रमास रमाबाई महिला मंडळातील मीना शिंदे, प्राजक्ता शिंदे, ज्योती शिंदे, आसराबाई गायकवाड, इंदुबाई साळवे, वच्छाला शिंदे, विमल चव्हाण, माग्रेट शिंदे, जया शिंदे, सुरेखा ठोकळ, कोकणी ताई, स्वाती कोकणे, गायत्री शिंदे तसेच नवजीवन मित्र मंडळ निवडुंगे, वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख आकाश शिंदे, सुभाष शिंदे, कुंडलिक शिंदे, साहिल शिंदे, मंगेश शिंदे, प्रतापराज शिंदे इत्यादी उपस्थित होते.