महाराष्ट्र
हनुमान टाकळीतील शेतकऱ्यांचे जमीन महसुल उपोषण
By Admin
हनुमान टाकळीतील शेतकऱ्यांचे जमीन महसुल अधिनियम उल्लंघन निषेधार्थ आमरण उपोषण
पाथर्डी तालुका प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथील शेतकरी सोमनाथ रंगनाथ भगत
जमीन महसुल अधिनियम उल्लंघन १९६६ व मुदत अधिनियम १९६३ उल्लंघन निषेधार्थ तहसिल कार्यालय पाथर्डी येथे आमरण उपोषण करणार असल्याचे जमीन महसूल अधिकारी, तहसिलदार अधिकारी पोलिस स्टेशनला निवेदन पञ दिले आहे.
त्यांनी निवेदनात सांगितले की,
श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथील सामाजिक सोमनाथ भगत यांच्या कोपरे शिवारातील १४/२/२ या गटातील जमिनीतील बांध त्यांच्या गटांतील भावकी व इतरांनी दि.२४/११/२०२४ रोजी रात्री जमिन महसूल अधिनियम कायद्याचे उल्लंघन करत खणून टाकल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या बांधाची रात्री चोरी झाली असल्याने त्यांनी तसे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक अहील्यानगर व तहसीलदार पाथर्डी यांना खनलेला बांध शोध घेऊन पूर्ववत करुन गटांतील सर्व बाजूच्या शेजाऱ्यांकडून कायद्याचे उल्लंघन करत अशा बेकायदेशीर कृत्याला आळा बसावा यासाठी आमरण उपोषण करणार असल्याचे प्रशासनाला कळवले आहे. दि.१० डिसेंबर २०२४ पासुन ते तहसील कार्यालय पाथर्डी येथे न्याय मिळेपर्यंत उपोषण करणार आहेत.निवेदनात म्हटले आहे की,
माझी आई हौसाबाई रंगनाथ भगत वय ५० व बंधु साईनाथ रंगनाथ भगत वय ३०हे राहत असुन वडील रंगनाथ लक्ष्मण भगत हे मयत आहेत. यांच्या मरणोत्तर आमची कोपरे, ता. पायडर्डी जि. अ.नगर, येथे गट नंबर १४/२/२ या ठिकाणी असणारी जमीनीत येणान्या पिकांच्या उत्पन्नावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालु आहे, असे असताना आमच्या शेजारील गटातील सर्व खातेदारांनी सहमतीने कोविड महामारी साथीचा रोग -१९ च्या महाराष्ट्र शासन जिल्हा बंदी व जमावबंदी आदेशाचा गैरफायदा येत सहमतीने, संगनमताने गेली तीन वर्षांपासून जमिनीत येण्यास प्रतिबंध करत आमची आई व बंधु याच्या मानवी हक्क व भारतीय राज्यघटनेच्या कायदेशीर हक्कांचे उल्लंघन करत मानसिक व आर्थिक ञास देत आत्महत्या करण्यासाठी मला माझ्या कुटुंबाला जाणीवपूर्वक प्रयत्न चालवले आहेत. याची प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली.परंतु योग्य ती दखल घेतली जात नसल्याने आज रोजी आमच्या आईचे मानसिक संतुलन हरपले आहे त्यामुळे आमच्या कुटुंबाची अपरिमित अशी आर्थिक सामाजिक व मानसिक हानी झाली असून ती कधीही सहन न होणारी अशी आहे आम्हाला आमच्या शेतात जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.
Tags :
45410
10