प्राचार्य संजय घिगे गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित
पाथर्डी प्रतिनिधी:
अहिल्यानगर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील एम. एम. नि-हाळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संजय घिगे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रांमध्ये कार्य करून आपल्या कार्याचा, कर्तुत्वाचा, व्यक्तिमत्त्वाचा आदर्श निर्माण करून हा पुरस्कार अहिल्यानगर येथे शिक्षण उपसंचालक पुणे येथील डॉ. गणपतराव मोरे व अहिल्यानगर माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल पंडित, अहिल्यानगर माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, जिल्हा मुख्याध्यापक संघ सरचिटणीस मिथुन डोंगरे. तसेच जिल्ह्यातील मुख्याध्यापक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल एकलव्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे, मा. जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे यांनी अभिनंदन केले आहे.