पागोरी पिंपळगाव येथे कोविड सेंटर सुरु करा.- बंडु अकोलकर
नगर सिटीझन live team- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव परीसरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. या ठिकाणी प्राथमिक उप आरोग्य केंद्र असून असून दररोज परीसरातील प्रभू पिंपरी,सुसरे,सांगवी बु.,साकेगाव,सोमठाणे,लोखंडवाडी,माळेगाव येथून दररोज आरोग्य तपासणीसाठी तसेच कोरोना विषाणूची लस घेण्यासाठी रुग्ण येत आहेत.परंतु या रुग्णांना उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी कोविड सेंटरला जावे लागत असून जवळपास पंधरा ते वीस किलो मिटरचा प्रवास कोविड रुग्णांना करावा लागतो आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी व रुग्णाला वेळेवर उपचार मिळण्यासाठी पागोरी पिंपळगाव येथे कोवीड केअर सेंटर सुरु करण्यात यावे परीसरात कोवीड सेंटर साठी शाळा परीसर तसेच परीसरातील बबनराव ढाकणे यांचा आश्रमचा परीसर आहे.या ठिकाणी कोविड सेंटर होवून रुग्णांची सोय होवू शकते.रुग्णांची हेळसांड होवू नये म्हणून परीसरात कोवीड सेंटरला मान्यता देण्यात यावी तसेच आरोग्य विभागाच्या सर्व सेवा सुविधा पूरवाव्यात.अशी मागणी पाथर्डी तालुक्यातील राष्टवादीचे युवा नेते कार्याध्यक्ष बंडु अकोलकर यांनी जिल्हा व तालुका आरोग्य विभाग यंत्रणेकडे केली आहे.