धक्कादायक बातमी- नारायणडोह येथे शेतामध्ये बॉम्बस्फोटात दोन जण जखमी, बाॕम्बशोधक पथकाची पाहणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 30 एप्रिल 2021
याबाबत सविस्तर हकीगत अशी की, नगर तालुक्यातील नारायणडोह येथे गावापासून दूर असणाऱ्या बाबासाहेब रामराव फुंदे यांच्या वस्तीवर जाण्यासाठी रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला होता. या मुरुमात पिन असणारा जुन्या काळातील बॉम्ब होता.
दरम्यान, शेतात गवत काढण्यासाठी आलेल्या फुंदे यांच्या पत्नी मंदाबाई यांना तो बाॅम्ब गोळा सापडला.
त्या महिलेने तो बाॅम्ब गोळा जवळ शेतात काम करत असलेल्या अक्षय साहेबराव मांडे या युवकाकडे दिला.
त्याने तो बाॅम्बगोळा जमीनीवर आपटला. यावेळी मोठा स्फोट झाला. यात, अक्षय व मंदाबाई फुंदे हे दोघे जखमी झाले आहेत.
या धमक्याचा आवाज 3 ते 4 कि.मी पर्यंत गेला. या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांनी पथकासह भेट दिली.
यानंतर घटनास्थळाची बाॅम्ब शोधक पथकाने पाहणी केली. या गावाच्या परिसरात अजून काही बॉम्ब आहेत का याची तपासणी बॉम्बशोधक पथकाने केली आहे. मात्र इतर ठिकाणी बॉम्ब आढळून आलेला नाही.
तालुक्यातील नारायणडोह गावात एका शेत वस्तीवर झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जण जखमी झाले आहेत.