महाराष्ट्र
Electricity लाईट बील: नागरिकांना वाढीव वीजदराचा भुर्दंड
By Admin
Electricity लाईट बील: नागरिकांना वाढीव वीजदराचा भुर्दंड
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यामध्ये नवे सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे सध्या तीन जणांचे महायुतीचे मंत्रिमंडळ आहे. महायुतीच्या सरकारकडून राज्यातील नागरीकांना वाढीव वीज बीले देऊन वेठीस धरले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक महाग वीज दिली जात असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान मुंबईतील वीज दरातही वाढ झाल्याचा जाब अदानी पॉवरला शिवसेना ठाकरे गटाने विचारला आहे. हिवाळी अधिवेशनात वीज दरवाढीचा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
महायुतीचे नेते गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील वीज दरांमध्ये 30% कपात करणार असे म्हणत होते, याची आठवणही जयंत पाटील यांनी महायुती सरकारला करुन दिली. भाजप आणि काँग्रेस शासित राज्यातील दरांची माहिती देत जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात अवाढव्य वीजदर असल्याचे दाखून दिले. यात कपात करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
राज्यात वीज दरवाढीवरून विरोधक हिवाळी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेण्याची चिन्ह दिसत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अध्यक्षांकडून राज्यातील वीज दराबद्दल सरकारला जाब विचारण्यात आल्यानंतर आज (गुरुवार) शिवेसना ठाकरे गटाने मुंबईतील वाढीव वीज बिलाबाबत अदानींच्या कंपनीला जाब विचारला आहे. ठाकरे गटाचे विधान परिषदेतील आमदार अनिल परब आणि आमदार सुनील प्रभू यांनी अदानी पॉवरच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून वाढीव दर कमी करण्याचे आवाहन केले आहे.
वीज बिलात 30% कपात करणार असे महायुती सरकारमधील लोकं मागच्या 4-5 महिन्यांपासून म्हणत आहेत. 30% कपात सोडाच पण इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रात सध्या वीज महाग मिळत आहे, असे जयंत पाटील यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
कोणत्या राज्यात किती दर?
राजस्थानमध्ये प्रति युनिटला 7.55 - 8.95 रुपये मोजावे लागत आहेत,
मध्य प्रदेशमध्ये 3.34 ते 6.80 रुपये मोजावे लागत आहेत
कर्नाटक राज्यात तर सरसकट प्रति युनिट 5.90 रुपये आहे
सर्वात जास्त वीजदर महाराष्ट्रात
महाराष्ट्रात प्रति युनिट 5.16 ते 17.79 रुपये मोजावे लागतात
वीज बिलात ३०% कपात करणार असे महायुती सरकारमधील लोकं मागच्या ४-५ महिन्यांपासून म्हणत आहेत. ३०% कपात सोडाच पण इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रात सध्या वीज महाग मिळत आहे.
राजस्थानमध्ये प्रति युनिटला ७.५५ - ८.९५ रुपये मोजावे लागत आहेत, तर मध्य प्रदेशमध्ये ३.३४ ते ६.८० रुपये…
वीज बिलात 30% कपात करणार, पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असे म्हणणारे आज प्रचंड बहुमताने सत्तेत बसले आहेत. सध्या राज्यात असलेले अवाढव्य वीजदर कमी करण्यात आता सरकारला कोणतीही अडचण नसावी, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
Tags :
32849
10