कोरोना लस घेण्यासाठी आधार कार्डची आता सक्ती नाही
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 16 मे,2021 , रविवार
आता कोरोना लस घेण्यासाठी आधार कार्डची गरज नाही.आपल्या कडे आधार कार्ड नसेल तरीही आपण लस घेऊ शकता.नागरिकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाने देशभर धुमाकूळ घातला आहे. अणेक उपाययोजना करूनही कोरोना आटोक्यात येताना दिसत नाही. आता यावर लसीकरण हाच एकमेव उपाय आहे असे म्हटले जात आहे.
परंतु लस घेता वेळेस आधारकार्ड असणे गरजेचे असल्याचे सांगितले जात होते. परंतु आता नुकतेच UIDAI ने जे स्पष्टीकरण दिले आहे त्यानुसार कोरोना लस घेण्यास आधार ची आवश्यकता नाही.
UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, आधारने नुकतंच Exception handling mechanism यंत्रणा तयार केली आहे. यात 12 अंकी बायोमेट्रीक आयडी नसतानाही सेवा देण्याची सुविधा असेल.
जर कोणत्याही रहिवाशांकडे एखाद्या कारणात्सव त्याचे आधार कार्ड नसेल, तरीही त्याला आधार कायद्यानुसार आवश्यक सेवा नाकरता येणार नाही.
विशेष म्हणजे जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तरीही कोरोना लस, औषधे आणि रुग्णालयात भरतीही होता येईल.
यूआयडीएआयने दिलेल्या माहितीनुसार, आधार हे केवळ जबाबदारी आणि जबाबदारीच्या सेवेसाठी आवश्यक आहे.
आधारमुळे कोणाच्याही आवश्यक सेवांवर परिणाम होऊ नये, असे परिपत्रक 24 ऑक्टोबर 2017 रोजी जारी केले होते.